Birthday SPL : खऱ्या आयुष्यातही तितकीच ‘बोल्ड’ अभिनेत्री भूमी पेडणेकर ! ‘सेक्स’वरसुद्धा ‘बिंधास्त’ अन् ‘बेधडक’ बोलते

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार भूमी पेडणेकर आज तिचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशलवर भूमी कायमच सक्रिय असते आणि आपलं मत मांडत असते. भूमी आजवर अनेकदा बोल्ड आणि बिंधास्त अवतारात दिसली आहे. खऱ्या आयुष्यातही ती तितकीच बोल्ड आहे. सेक्सवरही ती खुलून बोलत असते.

पत्नी पत्नी और वो सिनेमात एक सीन असा आहे ज्यात कार्तिक आर्यन तिला पहायला जातो. कार्तिक तिला विचारतो की, तुला काय आवडतं. यावर ती म्हणते की, मला सेक्स खूप आवडतो. याशिवाय इतरही तिचे काही बोल्ड डायलॉग सिनेमात आहेत. भूमीला याबद्दल जेव्हा विचारलं की, तुला हा डायलॉग बोलताना डोक्यात काय विचार आले ? काही अवघडल्यासारखं नाही वाटलं का ? यावर ती म्हणाली, हा डायलॉग बोल्ड आहे. परंतु आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मुलीच्या तोंडी दाखवल्यानं यात विचित्र वाटण्यासारखं काहीच नव्हतं.

भूमींनं बिंधास्तपणे दिलेल्या या उत्तरांतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. काहींनी कौतुकही केलं. असं असलं तरी तिच्या भूमिकेचंही खूप कौतुक झालं होतं. भूमी सोशलवरही अनेकदा बोल्ड अवतारात फोटो शेअर करत असते.

भूमीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पती पत्नी और वो या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत होते. प्रेक्षकांचाही सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. भूमीनं भूत सिनेमातही काम केलं आहे. लवकरच भूमी दुर्गावती, तख्त, डॉली किटी, वह चमकते सितारे अशा काही सिनेमात काम करताना दिसणार आहे.