वाढदिवस विशेषांक : डॉ. मनमोहन सिंग 

पोलीसनामा ऑनलाइन  
अतिशय मितभाषी म्हणून ओळखले जाणारे भारताचे १४ वे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे एक विचारवंत व अभ्यासक आहेत.  मनमोहन सिंग हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य असून राज्यसभेत सध्या आसामचे प्रतिनिधित्व करतात.पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील एका खेड्यात झाला.
शैक्षणिक पार्श्वभूमी 
 डॉ. सिंग यांनी १९४८ साली पंजाब विद्यापीठातून आपले उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांचे शैक्षणिक कर्तृत्व पंजाब विद्यापीठापासून इंग्लंड मधील केम्ब्रिज विद्यापीठापर्यंत विस्तारलेले आहे. १९५७ साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली . त्यानंतर १९६२ साली डॉ. सिंग यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी फील संपादन केली.
मनमोहन सिंग यांच्याविषयी  महत्वाच्या गोष्टी 
मनमोहन सिंग यांनी संयुक्त राष्ट्रसंघातून आपली नोकरी सोडली आणि एक प्रोफेसर म्हणून दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकवू लागले. मनमोहन सिंग यांनी १९७० व ८० च्या दशकात देशातील महत्त्वाच्या पदांवर काम केले ज्यात परराष्ट्र मंत्रालयातील सल्लागार, योजना आयोगाचे प्रमुख, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आदींचा समावेश आहे.
स्वतंत्र भारतच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड मानल्या जाणाऱ्‍या १९९१-१९९६  या पाच वर्षांच्या काळात डॉ. सिंग यांनी भारताचे अर्थ मंत्रिपद भूषविले. ते १९९१  मध्ये त्यांनी भारताचे गंभीर आर्थिक संकटात यशस्वीपणे नेतृत्व केले.२००८ साली जगभरात आर्थिक मंदीचे वारे आले असताना या आर्थिक मंदीची झळ भारताला मनमोहन सिंह याच्यामुळे लागली नाही.
त्यांनी २००४ पासून २०१४  पर्यंत एकूण १० वर्षे भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले आहे. भारतातील तसेच जगातील सर्वात उच्चशिक्षीत पंतप्रधान आहेत  त्याच्याकडे डी. लिटच्या १४  मानद पदव्या आहेत.
मनमोहन सिंग हिंदी वाचू शकत नाहीत. त्यांचे सर्व हिंदी भाषणे उर्दूमध्ये लिहिलेली असत.त्यांचे ‘इंडियाज एक्स्पोर्ट ट्रेंड्स अन्ड प्रोस्पेक्ट्स फोर सेल्फ ससटेन्ड ग्रोथ’ हे पुस्तक भारताच्या अंतस्थ व्यापारी धोरणाची समीक्षा करणारे आहे. डॉ. सिंग यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि संघटनांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी १९९३ मध्ये सायप्रस येथे राष्ट्रकुल प्रमुखांच्या बैठकीत आणि व्हिएन्ना येथे मानवाधिकारावरील जागतिक परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले.
The Accidental Prime Minister हे त्यांच्यावर आधारित पुस्तक संजय बारू यांनी लिहले आहे .
पुरस्कार 
 पद्मविभूषण पुरस्कार (१९८७), आशिया मनी अवार्ड (१९९३), केम्ब्रिज विद्यापीठाचा अॅडम स्मिथ पुरस्कार (१९५६), केम्ब्रिजमधील सेंट जॉन महाविद्यालयात उल्लेखनीय कार्याबद्दल राईट पुरस्कार असे काही विशेष पुरस्कार आहेत.
केम्ब्रिज व ऑक्सफोर्ड सारख्या अनेक विद्यापीठांकडूनही डॉ सिंग यांना मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे .याशिवाय जपान निहोन कायझाई शिम्बून सारख्या संस्थेने  डॉ. सिंग यांना सन्मानित केले आहे.
भारत-जपान मैत्रीसंबंध वृद्धिंगत करण्यासाठी गेल्या पस्तीस वर्षांत केलेल्या कार्यासाठी डॉ. सिंग यांना पुरस्कार देण्यात आला . असा सन्मान दिला जाणारे ते पहिलेच भारतीय आहेत.