वाढदिवस विशेषांक

१ ] डॉ. सुरेश पाटणकर
यूरेनॉलॉजिस्ट , पुणे

डॉ . सुरेश पाटणकर हे अनुभवी युरोलॉजिस्ट आहेत. पुण्यातील एरंडवाणे येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ . सुरेश पाटणकर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युरोलॉजिस्ट आहेत.

युरोलॉजिस्ट डॉ. सुरेश पाटणकर यांना दोन युरोपीय पेटंट मिळाले आहेत. एक पेटंट शस्त्रक्रियेनंतरच्या जखमा लवकर भरून काढण्यासाठी तयार केलेल्या हर्बल कम्पोझिशनसाठी आणि दुसरे पेटंट छोट्या किडनी स्टोन्स आणि त्याची पुनर्निर्मिती रोखण्यावरील उपचार यासाठी मिळाले आहे. याच संशोधनासाठी डॉ. पाटणकर यांना यापूर्वी दोन अमेरिकन आणि एक भारतीय पेटंट मिळाले आहे.
डॉ. पाटणकर हे भारतातील ५३४ डॉक्टरांपैकी एकमेव डॉक्टर आहेत, ज्यांना पाच पेटंट मिळाले आहेत.

Lybrate.com या साईट वर त्यांच्याशी रुग्णांना डायरेक्ट संवाद साधता येतो. तसेच अनेक वृत्तपत्रांतून त्यांचे आरोग्याविषयी लेख प्रसिद्ध झाले आहेत .

२ ] लकी अली

गायक-गीतकार, संगीतकार, अभिनेता असणाऱ्या लकी अलीचा जन्म १९ सप्टेंबर १९५९ रोजी मुंबई येथे झाला .त्यांचे मूळ नाव मक्सूद महमूद अली आहे. लकी अली बॉलिवूडचे प्रसिद्ध विनोदी अभिनेते मेहमूदचा यांचा मुलगा आहे.

लकी अलीने बंगलोरमधील बिशप कॉटन बॉयज स्कूलमध्ये शिक्षण घेतले . त्यांनी सॅनहोच्या व्हिडीओ ‘ओ सनम’ या आपल्या अल्बममधून संगीत क्षेत्रात पदार्पण केले . हा त्यांचा अल्बम सुपरहिट ठरला . या अल्बमसाठी त्यांना १९९६ मध्ये सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार प्राप्त झाला . लकी अली हे त्याच्या विशिष्ट गायन शैलीसाठी ओळखले जातात.

‘कहोना प्यार है’ या चित्रपटातील गाण्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठत अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरल होत . लकी अली यांनी त्रिकाल , सुर – द मेलडी ऑफ लाइफ , कास्क , पुस्तक आणि हे इझ लाइफ या हिंदी चित्रपटांतही अभिनय केला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2701f2a5-bbd4-11e8-b0a0-1b3985f9c3c4′]