वाढदिवस विशेषांक…इमरान खान 

कराची : वृत्तसंस्था

५ ऑक्टोबर १९५२

एक अष्टपैलू क्रिकेटपटू , यशस्वी कर्णधार ते पाकिस्तानचे पंतप्रधान असा बहुआयामी प्रवास करणाऱ्या इमरान खान यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९५२ ला लाहोर पाकिस्तान येथे झाला. त्यांचे वडील इराकमुल्ला खान हे अभियंता होते . त्यांच्या आईचे नाव शौकत खान होते. त्यांचे शिक्षण हिसोन कॉलेज लाहोर आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत झाले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’90e8febd-c869-11e8-99d2-7f4da7fd535d’]

कारकीर्द – 
क्रिकेट 

इमरानने वयाच्या १६ व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात  केली. त्याने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ब्लूज क्रिकेट संघात आपले स्थान मिळवले .  १९७६ मध्ये इंग्लडहून ते  पाकिस्तानला परतले आणि  १९७७ पासून ते पाकिस्तानी संघाकडून खेळायला सुरुवात केली . ७५ कसोटीत ३००० धावा करणारे आणि ३६२ विकेट घेणारे ते  पाकिस्तानचे  पहिले  गोलंदाज आणि जागतिक क्रमवारीत  चौथे गोलंदाज बनले.  इमरान  खान  हे जगातील वेगवान  गोलंदाजांपैकी  एक आहेत.

त्यांनी १७५ एकदिवसीय सामने खेळले आणि ३३. ४१ च्या सरासरीने ३७०९ धावा केल्या. इमरान खानने १९८२ ते १९९२ दरम्यान पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कर्णधार पदाची धुरा वाहिली . पाकिस्तानच्या विश्वचषक विजेत्या संघाचे ते कर्णधार होते . १९९२  मध्ये त्याने क्रिकेटमधून सेवानिवृत्ती घेतली.

जाणून घ्या प्रसिद्ध गायक संजीव अभ्यंकर यांच्याविषयी….

राजकारण 

इमरानने १९९२ मध्ये क्रिकेटमधून राजकारणात आपली जागा बनविली.  क्रिकेटमधून ते राजकारणात आले. पाकिस्तानमध्ये त्यांनी “ताहरिर-ए-इंसाफ” पक्ष स्थापन केला . ऑक्टोबर २००२ मध्ये ते मियावलीचे खासदार झाले. आता सध्या ते पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत.
वैवाहिक जीवन 

१९९५ साली इमरानने  पत्रकार जेमिमा गोल्डस्मिथशी विवाह केला. जेमीमाने लग्नापूर्वी आपला धर्म बदलला होता.नऊ वर्षाच्या सहजीवनानंतर त्यांनी जून २००४  मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला आणि ते वेगळे झाले.

जानेवारी २०१५ मध्ये त्यांनी इस्लामाबादमध्ये ब्रिटिश पाकिस्तानी घटस्फोटित महिला राहतम खानशी विवाह केला. ऑक्टोबर २०१५ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला आणि एकमेकांपासून वेगळे झाला. त्यानंतर त्याने पुन्हा बुश्रा मानिकाशी लग्न केले.

बोरघाटात बस दरीत कोसळली

इमरान  खानबद्दल काही इतर माहिती –
इमरानच्या आईचा कर्करोगाने मृत्यू झाला  म्हणून त्यांनी पाकिस्तानच्या लाहोर येथील शौकत खान मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलची स्थापना केली. २००८ मध्ये मियांवाली नामल कॉलेजची स्थापना केली.
राजकारणी आणि क्रिकेटर असणारे इमरान  खान लेखकही आहेत. इमरान  खान आत्मचरित्र, इमरान  खान क्रिकेट स्किल्स, सिंधु जर्नीः ए पर्सनल व्ह्यू ऑफ पाकिस्तान, ऑल राउंड व्यू, वॉरियर्स रेस: ए जर्नी थ्रू द लँड ऑफ द ट्रिप्युलेशन, प्रेत, पाकिस्तान : एक वैयक्तिक इतिहास ह्या पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे.

[amazon_link asins=’B0784D7NFX,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6313ca56-c86a-11e8-b553-d757bab38fab’]

पुरस्कार –
  • लंडनमध्ये लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले
  • पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान –  हिलाल ए. इम्तियाझ.
  • २०१२ मध्ये त्यांना पर्सन ऑफ द ईयर पुरस्काराचा सन्मान मिळाला.