16 व्या वर्षी शिक्षण सोडून करावे लागले चित्रपट, तनुजा यांचे असे जडले काजोलचे वडील शोमू मुखर्जी यांच्यावर प्रेम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   बॉलीवुड अ‍ॅक्ट्रेस तनुजा अनेक दशकांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्या आपल्या अभिनयाच्या क्षमतेसाठी ओळखल्या जातात. 23 सप्टेंबर 1943 ला जन्मलेल्या तनुजा 2020 मध्ये 77 वर्षांच्या होतील. ’रात अकेली है, बुझ गए दिए’ सारख्या गाण्यात तनुजा यांना तुम्ही सिडक्टिव्ह अवतारात सुद्धा पाहिले असेल आणि देव आनंदचे गाणे ’ये दिल न होता बेचारा’मध्ये तनुजा यांचा राग सुद्धा पाहिला असेल. तनुजा यांच्या खासगी आयुष्याबाबत आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहोत.

तनुजा यांना आठवतात आईच्या गोष्टी

तनुजा त्याकाळातील फायरब्रँड अ‍ॅक्ट्रेस शोभना समर्थ यांच्या कन्या होत्या. तनुजा चार भाऊ आणि बहिणींमध्ये दुसर्‍या नंबरवर होत्या आणि जेव्हा त्या लहान होत्या तेव्हापासून त्यांना आईच्या काही खास सवयी लक्षात आहेत. तनुजा यांनी एका इंटरव्ह्यूत सांगितले होते की, त्यांना आठवते की, कशाप्रकारे त्यांची आई लाल नेलपॉलिश आणि लाल लिपस्टिक लावायची. त्यांचा ओवल चेहरा खुप परफेक्ट होता. त्यांचा मस्कारा, त्यांची बॅकलेस चेली आणि सौंदर्य. तनुजा यांना वाटते की त्या कधीही आईसारख्या सुंदर होऊ शकल्या नाहीत.

तनुजा यांनी सांगितले की, जोपर्यंत त्यांची बहिण नूतन यांनी डेब्यू केला नव्हता, त्या फिल्म सेटवर जाऊ शकत नव्हत्या. नूतन यांची फिल्म ’हमारी बेटी’ मध्ये तनुजा यांनी एक छोटी भूमिका केली होती, ज्यामध्ये त्यांनी छोट्या नूतनचा रोल केला होता.

16 व्या वर्षी केला डेब्यू

तनुजा यांना कुटुंबाच्या आर्थिक स्थितीमुळे 16 वया वर्षीच डेब्यू करावा लागला होता.

त्यावेळी त्या स्विझरलँडच्या सेंट जॉर्ज शाळेत शिकत होत्या. तनुजा यांचे त्या अगोदरचे शिक्षण पाचगणीच्या सेंट जोसफ बोर्डिंग स्कूलमध्ये झाले होते आणि त्यानंतर त्यांना आईने स्विझरर्लंडला पाठवले. कारण तनुजा यांना भाषांची आवड होती. येथेच टायगर पतोडी (मंसूर अली खान पतोडी) यांची बहिण साबिहा पतोडी यांच्याशी तनूजाची मैत्री झाली.

मात्र, तनुजा यांच्या घरची आर्थिक स्थिती बिघडली आणि त्यांना घरी परतावे लागले. आईने त्यांना सांगितले की, त्या एक तर याचे दुख करून घेऊ शकतात किंवा हिंदी सिनेमात काम करू शकतात आणि तनुजा यांनी हिंदी फिल्म निवडल्या. 16 वर्षाच्या वयात 1960 मध्ये त्यांची पहिली फिल्म ’छबीली’ रिलीज झाली. यानंतर 1962 मध्ये ’मेमदीदी’. तनुजा यांनी अनेक बंगाली चित्रपट सुद्धा केले आहेत. तनुजा यांच्यानुसार बंगाली चित्रपट त्यांना अधिक आनंद देणारे वाटतात.

अशी झाली शोमू मुखर्जी यांच्याशी भेट

शोमू मुखर्जी यांच्याशी तनुजा यांची भेट फिल्म ’एक बार मुस्कुरा दो’च्या सेटवर झाली. ही कोणतीही फिल्मी स्टोरी नव्हती. दोघांना एकमेकांचा सहवास चांगला वाटू लागला आणि दोघे सोबत वेळ घालवू लागले. तनुजा आणि शोमू मुखर्जी यांनी डेटिंग सुरू केल्यानंतर काही दिवसात विवाह केला. 1973 मध्ये त्यांचा विवाह झाला आणि दोन मुली काजोल आणि तनीषा यांचा जन्म झाला.

पण तनुजा आणि शोमू मुखर्जी यांच्यातील संबंध चांगले राहिले नव्हते. तनीषा मुखर्जीच्या जन्मानंतर काही दिवसातच ते एकमेकांपासून विभक्त झाले. एका इंटरव्ह्यूत तनुजा यांनी सांगितले होते की, शोमू आणि त्या एकमेकांसाठी बनलेच नव्हते.

तनुजा यांची तुलना नेहमी नूतन आणि शोभना समर्थ यांच्याशी होत आली, परंतु तनुजा यांची ओळखसुद्धा खास होती. त्यांचे चित्रपट अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून आहेत.