3 अफेअर, 2 लग्न तरीही एकटाच… ! असं आहे कमल हसनचं लव्हलाईफ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध अभिनेता कमल हसनने पटकथा लेखन, दिग्दर्शन, निर्मिती, गायन, नृत्य, कोरिओग्राफी अशा सगळ्यात क्षेत्रात यश मिळवले. पण नात्यांच्या बाबतीत मात्र तो जरा अपयशी राहिला.

१९७० साली कमल हसन आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अभिनेत्री श्रीविद्याच्या प्रेमात पडला. दोघांचे अफेअर बराच काळ सुरु होते. मात्र यानंतर दोघांनीही वेगळ होण्याचा निर्णय घेतला. २००६ साली श्रीविद्याने जगाचा निरोप घेतला. त्यानंतर कमल हसनचे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या डान्सर वाणी गणपतीशी सूत जुळले आणि दोघांनी लग्न केले. १० वर्षाच्या संसारानंतर १९८८ मध्ये वाणी व कमल यांचा घटस्फोट झाला.

कमल हसनने अभिनेत्री सारिका बरोबर सूत जुळवले. दोघेही लिव इनमध्ये राहत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. १९८८ साली सारिकाने श्रुतीला जन्म दिला आणि त्यानंतर कमल हसनने सारिकाशी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर तिने अक्षराला जन्म दिला. मात्र २००२ मध्ये कमल आणि सारिका यांनी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. यानंतरही २ मुली असतानाही कमल हसनच्या अफेअरच्या चर्चा काही थांबल्या नाहीत. कमल हसनच्या आयुष्यात अभिनेत्री सिमरन बग्गा व त्यानंतर गौतमी तडीमल्ला आल्या अन निघून गेल्या.