बर्थडे स्पेशल : ललित प्रभाकर (अभिनेता)

 पोलीसनामा ऑनलाईन

‘जुळून येती रेशीमगाठी’ आणि ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकांमधून प्रचंड लोकप्रियता मिळालेला अभिनेता ललित प्रभाकर याचा आज वाढदिवस . ललितचा जन्म  १२ सप्टेंबर १९८७ रोजी कल्याणला झाला . मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट या तीनही क्षेत्रांमध्ये ललित प्रभाकर सध्या कार्यरत आहे.
ललिताच्या घरी अभिनय क्षेत्राची कोणतीच पार्श्वभूमी नाही. त्याची आई शिक्षिका व वडील आयटीआयमध्ये प्रोफेसर आहेत. त्याला  लहानपणापासून कलाक्षेत्राशी संबंधित गोष्टींची आवड होती . सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट जेव्हा तो  कॉलेजमध्ये गेलो तेव्हा ‘मितीचार’, कल्याण या नाट्यसंस्थेशी त्याचा संबंध आला आणि तेव्हापासून खर्‍या अर्थाने त्याचा अभिनयाचा  प्रवास सुरु झाला.
टीव्हीवर त्याने  ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मालिकेत एक नकारात्मक व्यक्तिरेखा साकारली . या  भूमिकेचं खूप कौतुक झालं. त्या भूमिकेनंतर लगेचच त्याला आदित्य देसाईची जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत भूमिका मिळाली. जी खूपच गाजली . मालिकेतून यश मिळाल्यानंतर कलाकाराची धाव असते ती सिनेमाकडे .  पण अभिनेता ललित प्रभाकरने मात्र  तो ‘ढोलताशे’ या नाटकातून रंगमंचावर पदार्पण केलं व त्यानंतर मोर्चा चित्रपटांकडं वळवला .
[amazon_link asins=’B06XCTBK9V,B07F84MG5S,B07B8PCNYM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6e2efe6e-b65c-11e8-b23a-fb40aae81bd2′]

कधीही व्हॉट्सअॅपचा वापर नाही

 

 ललितला व्हॉट्सअॅप वापरायला अजिबात आवडत नाही.  आतापर्यंत त्याने कधीही व्हॉट्सअॅप वापरले नाही  त्याच्या मते  हे वेळखाऊ अॅप्लिकेशन आहे. त्याऐवजी तो  काम करण्याला प्राधान्य देतो .   अॅपने कनेक्ट होण्यापेक्षा त्याला  फोनवर बोलायला किंवा प्रत्यक्ष भेटायला  आवडते.
अमृतांजन पुलाजवळ कंटेनर बंद : गणेशभक्तांच्या वाटेमध्ये वाहतूक कोंडी 
त्यानं अविनाश नारकर यांच्या ‘तक्षयाग’ या नाटकामध्ये  काम केलं होतं. ‘कुंकू’, ‘जिवलगा’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘जुळून येती रेशीमगाठी’ या त्याच्या गाजलेल्या टीव्ही मालिका. ‘तुझं तू माझं मी’, ‘चि. व चि. सौ. कां’ आणि ‘हम्पी’ या तीन चित्रपटांमध्ये आतापर्यंत त्यानं काम केलं आहे.  २०१७ मध्ये त्याला झी टॉकीजचा  सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.