वाढदिवस विशेषांक : महेश भट

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन

महेश भट

महेश भट एक चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व कथाकार आहे. महेश यांचा जन्म २० सप्टेंबर रोजी मुंबई येथे झाला.

कौटुंबिक पार्श्वभूमी –
त्यांच्या वडिलांचे नाव नानाभाई भट आहे आणि आईचे नाव शिरन मोहम्मद अली आहे. भट यांचे वडील गुजराती ब्राह्मण होते आणि त्यांची आई गुजराती शिया मुस्लिम होती. त्यांचा भाऊ मुकेश भट हा भारतीय चित्रपट निर्माता आहे.

वैवाहिक जीवन
किरण भट (लॉरेन ब्राइट) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन मुले आहेत- पूजा भट आणि राहुल भट. परंतु परवीन बॉबीशी त्याचा संबंध असल्यामुळे वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाला . यानंतर महेश यांच्या आयुष्यात सोनी राजदान आली. विशेष म्हणजे, सोनी राजदानसोबतच्या अफेअरदरम्यानही किरण आणि महेश एकत्र राहत होते. यानंतर किरणला घटस्फोट न देताच महेश यांनी सोनी राजदानसोबत लग्न केले. त्यांना आलिया व शाहीन या दोघी मुली आहेत .

लता मंगेशकर यांचा जीवनपट उलघडणार मीना मंगेशकर -खर्डीकर

करिअर-

वयाच्या २६ व्या वर्षी, भट यांनी ‘मंजिले और भी है या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. १९८० च्या फिल्मफेयर अवॉर्डमध्ये दोन पुरस्कार मिळाले. त्यांची सर्वात पहिली हिट फिल्म ‘अर्थ’ होती . त्यानंतर त्याचे ‘जनम’ आणि ‘नाव’ देखील सुपरहिट झाले . असं म्हटलं जातं की, या चित्रपटांद्वारे त्यांनी आपले वैयक्तिक आयुष्य स्क्रीनवर ठेवण्याचा प्रयत्न केला. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी सारांश ,जख्म ,सडक, यांसारख्या यशस्वी चित्रपटांचं निर्देशन केलं आहे. भट हे लव्ह, सेक्स, धोखा’ अशा थीम्सवर अनेक हिट चित्रपट देणारे निर्माता-दिग्दर्शक आहेत. त्यांचा सारांश हा चित्रपट १४ व्या मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला . १९८७ मध्ये त्यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं.

मुकेश भट या आपल्या भावासोबत त्यांनी ‘विशेष फिल्‍मस’ नावाचं प्रोडक्‍शन हाऊस सुरु केलं. भट बॅनरखाली बनलेल्या चित्रपटाची खासियत म्हणजे त्या चित्रपटाची गाणी सुपरहिट होतात. महेश भट्ट नेहमी नवख्या कलाकारांना काम करण्याची संधी देतात

प्रसिद्ध चित्रपट-
कौटुंबिक पार्श्वभूमी जिस्‍म, मर्डर, वो लम्‍हे ,डैडी, आवारगी, आशिकी, दिल है कि मानता नहीं, सड़क, गुमराह

वाढदिवसानिमित्त सडक चित्रपटाचा टीझर प्रदर्शित कधी काळी बॉलिवूडमध्ये सुपरहिट ठरलेला चित्रपट ‘सडक’ या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश भट यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’180f6da0-bca5-11e8-ba41-b37c5d9f2930′]