बर्थ-डे स्पेशल : आवाजाचा जादूगर मोहम्‍मद रफी

मुंबई : वृत्तसंस्था – हिंदी सिने सृष्टीत असे अनेक कलाकार होऊन गेले की ज्यांनी आपल्या कामामुळे या सिने सृष्टीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. आणि अनेक वर्ष त्यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य केले ,मग ते कलाकार अभिनेता असो गीतकार , संगीतकार किंवा गायक असो. असेच एक गायक आहेत की आज ते जगात नाही पण ते गेल्यानंतरही त्यांच्या गाण्यांमुळे ते अजूनही अनेक चाहत्यांच्या मनावर अधिराज्य  करत आहे.  त्या गायकाचे नाव आहे मोहम्मद रफ़ी.
 मोहम्मद रफ़ी यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी अमृतसर येथे झाला.त्यांच्या परिवाराचा गायकी आणि संगीताशी दूर -दूर पर्यंत काही संबंध नव्हता त्यांच्या मोठ्या  भावाचे  केस कापायचे दुकान होते .त्यांचा बराचसा वेळ हा त्या दुकानातच जायचा.  या दुकानाच्या जवळून एकफकीर  गाणं म्हणत जायचा तेव्हा मोहम्मद रफी त्या फकिराचा पाठलाग करायचे  त्या फकिराचा आवाज रफी यांना आवडायचा आणि त्याच्या आवाजाची नक्कल  रफी करत असायचे. त्यावेळी त्यांचे वय सात वर्ष होते. तेव्हा आजूबाजूचे  लोक त्यांच्या आवाजाची प्रशंसा करू लागले. तेव्हा त्यांच्या मोठ्या भावाने ‘उस्ताद अब्दुल वाहिद खान ‘यांच्याकडे रफ़ी यांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्यासाठी पाठवले.
एक दिवस ऑल इंडिया रेडियो मध्ये त्यावेळचे प्रसिद्ध गायक -अभिनेता कुंदन लाल सेहगल यांचा कार्यक्रम होता.तो  कार्यक्रम ऐकण्यासाठी मोहम्मद  रफी त्यांच्या मोठ्या भावासोबत आले होते. त्यावेळी लाईट गेल्याने सेहगल  यांनी येण्यास नकार दिला आणि कार्यक्रम रद्द झाला. तेव्हा रफी यांच्या  मोठ्या भावाने आयोजकांना विनंती करून रफी यांना संधी देण्यास विनंती केली आणि त्यांना ही संधी मिळाली. १३ व्या वर्षी त्यांनी या सार्वजनिक कार्यक्रमात गाण्याची संधी मिळाली.  प्रेक्षकांमध्ये त्यावेळचे प्रसिद्ध संगीतकार श्याम सुंदर बसले होते. रफी यांच्या आवाजाने ते खूप प्रभावित झाले आणि त्यांनी रफी यांना आपल्या सिनेमात गाण्यासाठी विचारले. तेव्हा रफी यांनी १९४४ मध्ये  पंजाबी सिनेमा ‘गुल बलोच’  या सिनेमा मध्ये पाहिले गाणे गायले.
या नंतर  मोहम्मद  रफी हे १९४६ मध्ये मुंबई येथे आले आणि संगीतकार नौशाद यांनी त्यांना ‘पहले आप’ या सिनेमात गाण्याची संधी दिली. १९५० मध्ये शंकर- जयकिशन ,नौशाद ,एस. डी बर्मन यांनी रफी याना खूप लोकप्रिय गाणे गाण्याची संधी दिली. १९६० साली ‘चौदहवी का चांद ‘ या गण्यासाठी त्यांना पहिल्यांदा ‘फिल्म फेयर’ पुरस्कार मिळाला. रफी यांना दुसरा ‘फिल्म फेयर’ पुरस्कार १९६१ मधील ‘ससुराल’ सिनेमाच्या ‘तेरी प्यारी प्यारी सुरत को किसकी नजर ना लगे ‘या गाण्यासाठी मिळाले. १९६५ मधील ‘दोस्ती’ सिनेमातल्या’चहुंगा मै तुझे सांज सवेरे’ या गण्यासाठी तिसरा ‘फिल्म फेयर’ पुरस्कार मिळाला. भारत सरकारने त्यांना १९६५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. १९६६ साली ‘सुरज’ चित्रपटातील ‘बहारो फुल बारसाओ’ या चित्रपटासाठी चौथा ‘फिल्म फेयर’ पुरस्कार मिळाले.
या कलाकारांसाठी गाणे गायले.  
अमिताभ बच्चन, अशोक कुमार ,धर्मेंद्र ,गुरुदत्त ,हिरोज खान बलराज साहनी, मनोज कुमार, शम्मी कपूर राज कपूर शशी कपूर ,दिलीप कुमार ,राजेश खन्ना ,सुनील दत्त ,राजेंद्र कुमार ,देवआनंद, विनोद खन्ना, संजीव कुमार. यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारानं साठी  मोहम्मद  रफी यांनी गाणे गायले. याशिवाय तेलगू सिनेमातील  एन . टी रामाराव आणि अक्किनेनी नागेश्वर राव यांच्या सिनेमातही गाणे गायले.
काही लोकप्रिय गीत 
मोहम्‍मद रफी यांनी  त्यांच्या करियर मध्ये रोमँटिक गाणी, कव्‍वाली, गजल आणि भजनदेखील गायले.ओ दुनिया के रखवाले  (बैजू बावरा १९५२) ,सर जो तेरा चकराए (प्यासा १९५७),ये है बॉम्बे मेरी जान (सी .आय .डी १९५७)मै जट यमला  पगला, मधुबन मै राधिका,परदेसीयो से ना, दर्दे दिल, क्या हुवा तेरा वादा, पारडं है परदा.  या सारखी अनेक लोकप्रिय गाणी त्यांनी गायली.
हा आवाजाचा जादूगार ३१ डिसेंबर १९८० मध्ये या जगाला सोडून गेला. त्याच्या जाण्याने कधी न भरणारी पोकळी निर्माण झाली. पण त्याच्या गाण्यामुळे आजही ते  लाखो लोकांच्या मनामध्ये जिवंत आहे.