आई-वडिलांच्या लग्नाआधीच ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा जन्म, ब्रेकअपनंतर झाली नशेत ‘बरबाद’, करिअरला ब्रेक ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – साऊथ सुपरस्टार कमल हासनची मुलगी आणि एक बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस श्रृती हासन आज आपला 34वा वाढदिसवस साजरा करत आहे. साऊथ ते बॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या श्रृतीचं बॉलिवूडमध्येही वेगळं स्थान आहे. श्रृती आपल्या कामापेक्षाही पर्सनल लाईफमुळेच अनेकदा चर्चेत आली आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या पर्सनल लाईफ बद्दल काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. अनकेांना माहिती नसेल परंतु तिच्या आई-वडिलांच्या लग्नाआधीच श्रृतीचा जन्म झाला होता.

View this post on Instagram

💖 👑

A post shared by @ shrutzhaasan on

श्रृतीचे आई वडिल कमल हासन आणि सारीका हे दोघंही लिव इन रिलेशशिपमध्ये रहात होते. एके दिवशी सारीका प्रेग्नटं झाली. यानंतर श्रृतीचा जन्म झाला. तिच्या जन्मानंतर दोन वर्षांनी कमन हासन आणि सारीका यांनी लग्न केलं. यानंतर सारीकानं अक्टींगला रामराम ठोकला. 1991 मध्ये त्यांना अक्षरा नावाची दुसरी मुलगी झाली.

श्रृतीचं शालेय शिक्षण चेन्नईमध्ये झालं आहे. यानंतर तिनं मुंबईच्या सेंट अँड्र्यू कॉलेजमधून सायकॉलॉजी विषयाचं शिक्षण पूर्ण केलं. यानंतर श्रृती कॅलिफोर्नियाला गेली आणि तिनं तिथे म्युझिकचं शिक्षण घेतलं. तिच्या वडिलांच्या चाची 420 या सिनेमात तिनं एक गाणं गायलं आहे.

अयशस्वी सिनेमातील आपल्या करिअरनंतर श्रृतीचं लव लाईफही वादग्रस्त राहिलं आहे. श्रृती मायकल कॉरसेलसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यांचं नातं जास्त दिवस टिकू शकलं नाही. यानंतर ती पूर्णपणे खचली होती. ती नशेच्या आहारी गेली होती. श्रृतीला काही दिवस तिच्या करिअरमधूनही ब्रेक घ्यावा लागला होता. या सगळ्यातून बाहेर पडत लवकरच ती मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे.

https://www.instagram.com/p/B0_goBLBPtG/

श्रृतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर बालकलाकार म्हणूनच तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. लक या सिनेमातून तिनं बॉलिवूड करिअरला खरी सुरुवात केली होती. श्रृतीनं दिल तो बच्चा है जी, रमैय्या वस्तावैय्या, वेलकम बॅक, गब्बर अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. श्रृतीला म्हणावं तसं यश काही मिळालं नाही.

 

फेसबुक पेज लाईक करा

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like