#BirthdaySpecial : आपल्याच विद्यार्थिनीसोबत आर माधवनने केले लग्न, इंटिमेट सीनवेळी पत्नीही असायची सेटवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य सुपस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आर माधवनचा आज 49 वा वाढदिवस आहे. अनेकांना माहिती नसेल परंतु आर माधवनचे पूर्ण नाव रंगनाथ माधवन आहे. सिनेमात आपल्या दमावर आपले वेगळे नाव करणारा अशी आर माधवनची ओळख आहे. आर माधवन हा केवळ अभिनेताच नाही तर तो लेखक, दिग्दर्शक तसेच सूत्रसंचालकही आहे. तुम्हाला माहीत आहे का आर माधवनला आर्मीमध्ये जाण्याची खूप इच्छा होती.

अभ्यासात अव्वल असणाऱ्या आर माधवनला 1988 साली शाळेतून कल्चरल अॅम्बेसिडर म्हणून कॅनडात रिप्रेझेंट करण्याची संधीही मिळाली होती. एनसीसीत असताना आर माधवनला महाराष्ट्रातून बेस्ट कॅडेटने सन्मानित केले आहे. याशिवाय आर माधवनला एनसीसी कॅडेटच्या माध्यमातून आर माधवनला इंग्लंडला जाण्याचीही संधी मिळाली होती. इंग्लंडमध्ये त्याने ब्रिटीश आर्मी, रॉय नेवी, एअर फोर्समधून ट्रेनिंग घेतली आहे.

अशी झाली आर माधवनची सिनेमात एंट्री

अनेकदा परदेशात जाण्याची संधी मिळवणाऱ्या आर माधवनने 1996 साली त्याचा पोर्टफोलिओ मॉडेलिंग एजंसीला दिला. चांगल्या व्यक्तीमत्त्वामुळे त्याला जाहिराती मिळू लागल्या. आर माधवनने 1996 साली सँडलवूड टॉक जाहिरातीत काम केले. यानंतर आर माधवनला या जाहिरातीचे दिग्दर्शक संतोष सिवान यांनी इरुवरमध्ये कास्ट केले. यानंतर आर माधवनने आपल्या संधीचे सोने केले. त्याचा हा सिनेमा सुपरहिट ठरला.

या सिनेमाने आर माधवनला दिली ओळख

आर माधवनचा पहिला सिनेमा हिट झाल्यानंतर त्याने यातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. नंतर त्याला सहज सिनेमे मिळत गेले. एकामागे एक सिनेमे हिट होत गेले. यानंतर आर माधवन स्टार म्हणून नावारूपाला आला. आर माधवनने 1998 साली इन्फर्नो या इंग्रजी सिनेमातही काम केले आहे. रेहना है तेरे दिल में या सिनेमाने त्याला विशेष ओळख मिळवून दिली.

कोणाशी केले आर माधवनने लग्न ?

कोल्हापूरमध्ये ओळख झालेल्या सरीता बिर्जेसोबत आर माधवनने विवाहगाठ बांधली. पर्सनॅलिटी डेव्हेलपमेंटचा क्लास अटेंड करायला सरीता आली होती. तिचा मेंटॉर माधवन होता. सरीताला एअर हॉस्टेसची नोकरी मिळाली तेव्हा ते दोघेही डिनरला गेले होते. तिला माधवनचे आभार मानायचे होते. जवळपास 8 वर्ष एकमेकांना त्यांनी डेट केले. अखेर 1999 साली दोघे विवाहबद्ध झाले. त्यांना वेदांत नावाचा एक मुलगाही आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा एखादा इंटिमेट सीनची शुटींग असायची तेव्हा माधवन त्याच्या पत्नीला सेटवर घेऊन यायचा.

कशी आहे आर माधवनची फॅमिली ?

आर माधवनचे वडिल टाटा स्टील कंपनीत मॅनेटमेंट एक्झिक्युटीव्ह होते तर आई सरोज या बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर होत्या. आर माधवनला एक बहिणही आहे. देविका रंगनाथन असे आहे. देविका ही एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. देविका युकेमध्ये असते.