बर्थडे स्पेशल : राधिका आपटे 

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन

बिनधास्त व दमदार अभिनयामुळं नेहमी चर्चेत राहणाऱ्या राधिका आपटेचा  जन्म ७ सप्टेंबर १९८५ रोजी तामिळनाडूच्या वेल्लोर मध्ये झाला. मूळची पुण्याची असलेल्या राधिकाचे  शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयातून  झाले. राधिकाने गणित विषयात पदवी मिळवली. पण तिची आवड सुरूवातीपासूनचं अभिनयात होती. त्यानंतर ती पुण्यातील ‘आसक्त’ या मराठी नाट्यसंस्थेमध्ये दाखल झाली. तू, पूर्णविराम, मात्र रात्र आणि कन्यादान इत्यादी मराठी नाटकांमधून तिने अभिनय केला राधिका गेल्या दहा वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. पण गेल्या चार-पाच वर्षांत ती एकदम प्रकाशझोतात आली.

२००५ मध्ये ‘वाह लाईफ हो तो ऐसी’ चित्रपटात राधिकाने एक लहानशी भूमिका केली होती. पण या चित्रपटातून तिला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. २०११ मध्ये ‘शोर इन दि सिटी’ चित्रपटातून ती नावारुपाला आली. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच्या ‘मांझी’ या चित्रपटापासून राधिकाच्या अभिनयाची चर्चा व्हायला लागली.

[amazon_link asins=’B07C2ZW7ZB,B077F6JBCN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2128d13e-b29e-11e8-8a8a-d5cec3d7f90b’]
द वेटिंग रुम’, ‘रक्तचरित्र’, ‘शोर इन द सिटी’, ‘बदलापूर’, ‘हंटर’, ‘लायन’, ‘मांझी द माऊंटन मॅन’, ‘पार्च्ड’, ‘फोबिया’, ‘कबाली’ यांसह अनेक गाजलेल्या हिंदी आणि इतर काही दाक्षिणात्य सिनेमांत काम करणारी मराठी इंडस्ट्रीतसुद्धा ती सक्रिय आहे. मराठीत तिने ‘घो मला असला हवा’, ‘समांतर’, ‘तुकाराम’, ‘पोस्टकार्ड’, ‘लय भारी’ या चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. लास्ट स्टोरीएस ,घुल, सीक्रेट यांसारख्या वेबसीरीज मधूनही  तिने काम केलं आहे.

आता महाराष्ट्रात ड्रोनने होणार रुग्णांना रक्तपुरवठा

२०११ मध्ये कंटेम्परेरी डान्स शिकायला राधिका लंडनमध्ये गेली होती. याच डान्स क्लासमध्ये  म्युझिशियन बेनेडिक्टसोबत तिची ओळख झाली  २०१२ मध्ये राधिकाने  बेनेडिक्टसोबत गुपचूप लग्न केले. राधिकाला मराठी , हिंदी ,इंग्रजी , तामिळ ,तेलगू  मल्याळम आणि  बंगाली अशा सात भाषा येतात. बॉलीवूडमध्ये सर्वाधिक भाषा येणारी राधिका ही एकमेव अभिनेत्री आहे.

 हिंदीशिवाय बंगाली, मराठी, तेलगू आणि मल्याळम चित्रपटात तिने काम केले आहे. ‘दि वेटिंग रूम’, ‘रक्त चरित्र 1’, ‘रक्त चरित्र 2’, ‘आई एम’ यांसारख्या चित्रपटात मुख्य भूमिका केल्या होत्या. ६ वेगवेगळ्या भाषांमध्ये ३० पेक्षा अधिक चित्रपट केल्यानंतर २०१५ मध्ये ‘बदलापुर’ चिरपटातून तिला हिरोईन म्हणून ओळख मिळाली.