अजय देवगणच्या ‘या’ अफेअरची चर्चा, यादी वाचून काजोलला बसेल ‘धक्का’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   आपल्या चित्रपटांमुळे बॉलिवूड अभिनेता अजय देवगण म्हणजेच सिंघम नेहमीच चर्चेत असतो. आज हा सिंघम त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. एक यशस्वी अभिनेता म्हणून नावारुपाला येत असतानाच त्याच्या अफेअर आणि लिंक अपच्या चर्चा रंगल्या. विविध अभिनेत्रींशी त्याचे नाव जोडले गेले. सिंघम एकेकाळी अफेअरमुळेही तो चर्चेत राहिला. तर जाणून घेऊ त्या अभिनेत्रींबाबत…

अजय देवगणचे सर्वाधिक चर्चेत राहिलेले अफेअर होते बेधडक आणि बिनधास्त अभिनेत्री कंगना राणौतसोबतचे. अजय आणि कंगणाचे अफेअर खूप गाजले होते. कंगना आणि अजय एकमेकांना ‘वन्स अपऑन ए टाइम इन मुंबई’ या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान भेटले होते. त्या वेळी दोघांची जवळीक वाढल्याचे बोलले जाते. काजोल या चर्चांमुळे बरीच वैतागली होती. असे म्हणतात की, जेव्हा काजोलला या गोष्टी समजल्या तेव्हा काजोलला या दोघांना वेगळे करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला होता.

अजय सोबत ‘रेड’ व ‘बादशाहो’ यासारख्या सिनेमात झळकलेली अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिच्यासोबतही ‘सिंघम’च्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. या बातम्यांमध्ये फार काही तथ्य नव्हते. पण चर्चा जोरात होत्या. अजय व करिश्मा कपूरने अनेक सिनेमात एकत्र काम केले. चर्चा खरी मानाल तर एकमेकांसोबत काम करता करता हे दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते. रवीना टंडनसोबतही अजयचे नाव जोडले गेले. असे म्हणतात की, करिश्मा कपूरला डेट करत असतानाच अजयच्या आयुष्यत रवीनाची एंट्री झाली आणि अजयने करिश्माला सोडून रवीनाशी जवळीक वाढवली.

मनीषा कोईराला या सुंदर अभिनेत्रीसोबतही अजयचे नाव जोडले गेले. असे म्हणतात की, ‘धनवान’ या सिनेमाच्या शूटींगवेळी मनीषा अजयच्या प्रेमात पडली होती. अर्थात हे प्रेम एकतर्फी होते. ‘दे दे प्यार दे’ या सिनेमात अजय देवगण रकुल प्रीत सिंहसोबत दिसला होता. या दोघांमध्ये सेटवर चांगली मैत्री झाली होती. पण काही लोकांनी याला अफेअरचे नाव दिले होते. तब्बूसोबत अजयचे अफेअर होते की, नाही हे दाव्याने सांगता येणार नाही. पण तब्बू अजयच्या प्रेमात होती, असे मानले जाते. पण अजयने याबद्दल कधीही मौन तोडले नाही. मी सिंगल असण्याचे कारण अजय देवगण आहे, असे तब्बू एका मुलाखतीत म्हणाली होती.