बर्थडे स्पेशल : ऋषी कपूर, अभिनेता व दिग्दर्शक

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन

अनेक हिट चित्रपट देणाऱ्या अभिनेते ऋषी कपूर यांचा जन्म  ४ सप्टेंबर १९५२ ला झाला. त्यांनी मेरा नाम जोकर या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. बॉबी या चित्रपटाद्वारे राज कपूर यांनी त्यांना लाँच केले. त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

पदार्पणातच ‘बॉबी’ चित्रपटासाठी ‘फिल्मफेअर’ पुरस्कार पटकावल्यानंतर पुढे त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत . गेली ४० वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत व त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. पत्‍नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.जहरीला इंसान’ या चित्रपटात ही जोडी पहिल्यांदा झळकली होती. २२ जानेवारी १९८० रोजी ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांनी लग्न केलं.

दो  प्रेमी, नसिब, प्रेमग्रन्थ, लैला मजनू, सरगम, दुनिया, हीन, दामिनी, प्रेमयोग, याराना, नया  दौर  यासारखे असंख्य  चित्रपट त्यांचे गाजले आहेत.

अनेक सुपरहीट चित्रपट दिल्यानंतर ऋषी कपूर यांनी दिग्दर्शनही केलं. ऐश्वर्या राय आणि अक्षय खन्ना यांच्या ‘आ अब लौट चलें’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला होता.ऋषी कपूरसाठी किशोर कुमार, मोहम्मद रफी अशा अनेक गायकांनी गाणी म्हटली आणि ती सगळीच गाणी यशस्वी ठरली. ऋषी कपूरने ‘खुल्लम खुल्ला’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.

[amazon_link asins=’B01BKEZYBY,B07D11MDBS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dc455da9-b047-11e8-b5c4-dd240d9907a9′]