रोहित शेट्टीचा संघर्षमय प्रवास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मसाला आणि एंटरटेनर चित्रपटांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी याचा आज वाढदिवस आहे. रोहितने आपल्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट केले आहेत. अलीकडे रिलीज झालेला त्याचा ‘ सिम्बा ‘ हा सिनेमाही ब्लॉकबस्टर ठरला आहे. सध्या रोहित यशाच्या शिखरावर आहे. पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता . त्याच्या संघर्षाच्या  काळात अभिनेत्री तब्बूच्या साड्या प्रेस करण्याचे कामही त्याने केले आहे. तसेच त्याने काजोलचा स्पॉटबॉय म्हणूनही काम केले आहे.
रोहित शेट्टी हा सुप्रसिद्ध स्टंटमन आणि विलेन एम बी शेट्टी यांचा मुलगा आहे. वडिलांच्या निधनानंतर दोन बहिणी आणि आईची जबाबदारी रोहितच्या खांद्यावर आली. आजही ते दिवस आठवले की रोहित भावूक होतो. रोहितची पहिली कमाई ३५ रूपये होती. घर चालवण्यासाठी पैसे नव्हते. शिक्षण सुरु ठेवले असते तर घर चालवू शकलो नसतो. अखेर त्याने कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला , आणि काम सुरु केले. हे काम काय तर १९९५ मध्ये ‘हकीकत’ या चित्रपटाच्या सेटवर तब्बूच्या साड्या प्रेस करण्याचे कामही त्याने केले. काजोलचा स्पॉटबॉय तिचे टचअप करण्याचे काम स्वीकारले . अखेर रोहित शेट्टीला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून संधी मिळाली. ‘फूल और कांटे’ या अजय देवगणच्या चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून रोहितने करिअरची सुरुवात केली. पुढे याच अजयसोबत रोहितने १० चित्रपट केले आहेत. अशी माहिती त्याने एका मुलाखतीत सांगितली आहे.

२००३ मध्ये रोहितने दिग्दर्शन क्षेत्रात पहिले पाऊल ठेवले त्यानंतर त्याचा पहिला चित्रपट ‘जमीन’ हा होता . त्या चित्रपटात अजय देवगण  हिरो होता . पण हा चित्रपट आपटला. त्या एका फ्लॉपनंतर लोकांनी रोहितचे फोन उचलणे बंद केले होते. या काळात फक्त अजय देवगण त्याच्या सोबत राहिले. आज मी काही आहे तो फक्त अजय देवगणमुळेच तो माझ्या पाठीशी सपोर्ट सिस्टम बनून राहिला. त्यानंतर त्याने अजय देवगण बरोबर ‘गोलमाल’ चित्रपट बनवला . तो सुपरहिट झाला. त्यानंतर रोहितने कधीच मागे वळून पाहिलेच नाही.  आतापर्यंत गोलमालचे चार पार्ट आले आहेत. तसेच या चारही चित्रपटांनी भरपूर कमाई केली आहे.