चित्रपटात अभिनेता होण्याआधी शाहिद कपूर होता बॅकग्राऊंड डान्सर

मुंबई : वृत्तसंस्था – ‘इश्क विश्क’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरवात करणाऱ्या शाहिद कपूरचा आज वाढदिवस २५ फेब्रुवारी १९८१ मध्ये दिल्लीत शाहिदचा जन्म झाला. सुप्रसिद्ध अभिनेते पंकज कपूर हे शाहिदचे वडिल त्यामुळे शाहिदला घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला होता. पण बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करायला शाहिदला खडतर प्रवास करावा लागला आज भलेही शाहिद सुपरस्टार झाला आहे. पण पहिला चित्रपट मिळण्याआधी शाहिदला १०० वेळा ऑडिशन्स मध्ये रिजेक्ट करण्यात आले होते. असे खुद्द शाहिदने एका मुलाखतीत सांगितले.

बॉलिवूडमध्ये चॉकलेट बॉय म्हणून ओळख निर्माण करणारा शाहिद कपूर एक चांगला अभिनेता तर आहेच पण तो एक चांगला डान्सर सुद्धा आहे. चित्रपटात अभिनेता म्हणून काम करण्याआधी शाहिद हिरोच्या मागे डान्स करणारा बॅकग्राऊंड डान्सर होता. सुभाष घई यांच्या ‘ताल’ चित्रपटात ऐश्वर्या रायच्या मागे आणि यश चोप्रा यांच्या ‘दिल तो पागल’ चित्रपटात करिश्मा कपूरच्या मागे शाहिद कपूर बॅकग्राऊंड डान्सर म्हणून दिसला होता. तसेच याकाळात शाहिद अनेक गाण्याच्या आल्बममध्येही दिसला होता.

शाहिदचा ‘इश्क विश्क’ दिग्दर्शित करणारे केन घोषने शाहिदला आपल्या दुसऱ्या चित्रपटासाठीही साईन केले आणि शाहिदला लीड अ‍ॅक्टर म्हणून दुसरा चित्रपट मिळाला. या चित्रपटाचे नाव होते, ‘फिदा’ २००४ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटापासून शाहिद आणि करिना यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. या चित्रपटानंतर शाहिद करिनाने ‘चूप चूप के’, ‘३६ चायना टाऊन’, ‘जब वी मेट’ सारख्या चित्रपटात एकत्र अभिनय केला. ‘जब वी मेट’ चित्रपटानंतर शाहिद-करिनामध्ये ब्रेकअप झाला.

२००६ मध्‍ये रिलीज झालेल्या ‘विवाह’ चित्रपटाने शाहिदच्‍या करिअरला वेगळ्‍या उंचीवर नेले. अमृता रावमुळे शाहिद आणि करीनाचा ब्रेकअप झाला असे म्‍हटले जाते अमृता राव शिवाय शाहिदचे नाव विद्या बालन, प्रियांका चोप्रा आणि टेनिसपटू सानिया मिर्जासोबतही जोडले गेले.

१९९७ मध्ये करिअरची सुरुवात करणाऱ्या शाहिदने आत्तापर्यंत ‘जब वी मेट’, ‘हैदर’, ‘उडता पंजाब’, ‘विवाह’, ‘कमीने’ आणि ‘पद्मावत’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. २०१५ मध्‍ये आपल्‍यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या मीरा राजपूतशी शाहिद कपूरने विवाह केला. लवकरच शहीद कपूरचा ‘कबीर सिंग’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

You might also like