बर्थडे स्पेशल : स्मिता तळवलकर

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन

दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका ते नाटक, चित्रपट आणि चित्रमालिकांतील अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका हा असा प्रवास करणाऱ्या  स्मिता तळवलकर यांचा जन्म ५  सप्टेंबर १९५५ ला झाला. मॉडेलिंग, वृत्तनिवेदिका, नाट्य कलाकार, चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका, लेखिका, वितरक अशा कितीतरी भूमिकांत त्यांनी स्वत:ला सिद्ध केले .

स्मिता तळवलकर यांचे मूळचे नाव स्मिता सदाशिव गोविलकर. पुण्याच्या हुजूरपागा शाळेत त्या शिकल्या. रुईया महाविद्यालयामधून तत्त्वज्ञान व मानसशास्त्र घेऊन त्यांनी बी.ए. केले, तर सोफिया महाविद्यालयामध्ये मास कम्युनिकेशनचा व पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

१९७३ साली, म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षीच स्मिता यांनी अविनाश विष्णू तळवलकर यांच्याशी लग्न केले. त्यांनी शालेय वयातच नाटकातून भूमिका करायला सुरुवात केली. त्या वेळी त्या ‘उदय कलाकेंद्र’, ‘कुमार कलाकेंद्र’, ‘राज्य नाट्यस्पर्धां’मधून काम करत असत.

छावा’ (१९८३) या नाटकाद्वारे त्या व्यावसायिक नाटकात आल्या. त्यानंतर त्यांनी ‘तू फक्त हो म्हण’, ‘अभिनय’, ‘उंच माझा झोका गं’ अशा बर्‍याच नाटकांतून भूमिका साकारल्या. सन १९८६ साली दिग्दर्शक मुरलीधर कापडी यांनी ‘तू सौभाग्यवती हो’ या चित्रपटाद्वारे त्यांना चित्रपटात आणले. ‘धाकटी सून’, ‘गडबड घोटाळा’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’ इत्यादी मराठी चित्रपटांतून भूमिका यशस्वी भूमिका साकारल्या . ‘कळत नकळत’ या चित्रपटाद्वारे त्यांनी निर्मिती क्षेत्रात पाऊल  टाकलं . कळत नकळत’ला चार राष्ट्रीय व नऊ राज्य पुरस्कार मिळाले . ऊन-पाऊस’, ‘अवंतिका’, ‘उंच माझा झोका’ आदी पंचवीसेक मालिकांची निर्मिती त्यांनी केली.

[amazon_link asins=’B00K806TQ6,B0725K4XXT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c5fe3e11-b100-11e8-ae33-ef2c237ee809′]
चौकट राजा’, ‘सवत माझी लाडकी’, ‘तू तिथं मी’, ‘सातच्या आत घरात’, ‘आनंदाचं झाड’ असे चित्रपट निर्माण करताना स्मिता तळवलकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चे वेगळे स्थानही निर्माण केले.स्मिता यांच्या वृत्तपत्रीय लेखनाचे ‘पिंपळपान’ (लोकसत्ता) व ‘जगावेगळी’ (तरुण भारत) असे दोन संग्रहदेखील पुस्तकरूपात प्रसिद्ध झाले आहेत.स्मिता तळवलकर यांनी अस्मिता चित्र ॲकॅडमीची स्थापना केली होती. दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर त्या १७ वर्षे वृत्तनिवेदिका होत्या. कलाक्षेत्रात चौफेर कर्तृत्व गाजवणाऱ्या  स्मिता तळवलकर यांचा ६ ऑगस्ट २०१४ कॅन्सरने मृत्यू झाला.

जाहिरात