होय ! सौरव गांगुलीसोबत Affair होते; 18 वर्षांनंतर नगमाचा खुलासा, यामुळे झाले Break-Up

पोलीसनामा ऑनलाईन टीम : प्रसिध्द अभिनेत्री नगमा आज वाढदिवस साजरा करत आहे. तामिळ आणि तेलगू इंडस्ट्रीतील नगमा एक यशस्वी अभिनेत्री असून तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात बॉलीवूडपासूनच केली होती.1990 साली प्रदर्शित ‘बागी’ या सिनेमाद्वारे नगमाने फिल्मी करिअरची सुरुवात केली. या सिनेमात ती सलमान खान सोबत झळकली होती. नगमाचा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला होता. त्यावर्षी सर्वाधिक कमाई करणा-या चित्रपटांच्या यादीत हा सिनेमा 7 व्या क्रमांकावर होता. या सिनेमानंतर नगमाच्या घरासमोर निर्मात्यांची रांगा लागल्या होत्या. पण नगमाची फिल्मी कारकिर्द तिच्या कामापेक्षा तिच्या पर्सनल लाईफमुळेच अधिक चर्चेत राहिली आहे.

बॉलीवूडमध्ये पहिलाच सिनेमा सुपटरहिट ठरल्यानंतर देखील तीने आपला मोर्चा साऊथ फिल्म इंडस्ट्रीकडे वळवला. पण तिथेही तिच्या वाट्याला फार काही यश आले नाही. मग भोजपुरी, पंजाबी सिनेमातही तिने काम केले. तिथेही अपयश पदरी पडल्याचे पाहून अखेर नगमाने 2007 मध्ये फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकत राजकारणात एन्ट्री केली. पण नगमाची फिल्मी कारकिर्द तिच्या कामापेक्षा तिच्या पर्सनल लाईफमुळेच अधिक चर्चेत राहिली. क्रिकेटजगतातील एका दिग्गज क्रिकेटपटूसोबत तिचे नाव जोडले गेले. तो कोण तर सौरभ गांगुली. होय, अभिनेत्री नगमा एका क्रिकेटपटूच्या प्रेमात वेडी झाली होती. खुद्द नगमाने एका मुलाखतीत या नात्याचा खुलासा केला होता.

नगमा सांगते,2000 साली सौरभ गांगुली व नगमा यांच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. सौरभ त्यावेळी विवाहित होता. त्यामुळे दोघांनीही या नात्यावर चुप्पी साधली. पण 2018 मध्ये म्हणजे तब्बल 18 वर्षांनंतर खुद्द नगमाने या नात्याची कबुली दिली होती. हे नाते का तुटले याचाही खुलासा तिने केला होता.आम्ही दोघांनी मीडियासमोर आमच्या प्रेमाची कबुली दिली नसली, तरी सर्वांनाच आमच्या नात्याबद्दल ठाऊक होते. पण कालांतराने हे नाते संपुष्टात आले. गांगुली करिअरच्या शिखरावर होता, त्याकाळात टीम इंडियाचा पराभव आणि कर्णधाराचा खराब परफॉर्मन्स चाहते सहन करू शकत नव्हते. याचा परिणाम आमच्या नात्यावरही झाला आणि गांगुलीने मला सोडून त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला. माझ्या मते, त्याचा निर्णय एकदम योग्य होता.

आम्ही परस्पर सहमतीने एकमेकांपासून वेगळे झालो होतो. आता तो भूतकाळ झाला आहे, असे नगमा या मुलाखतीत म्हणाली होती. भोजपुरी अभिनेता रवी किशनसोबतही नगमाचे नाव जोडले गेले होते. अर्थात कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले. याचे कारण म्हणजे रवी किशन आधीच विवाहित होता.