उर्मिला मातोंडकरने का केला बॉलीवूडला रामराम ?

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूडची ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकर हिचा आज वाढदिवस आहे. उर्मिलाचा जन्म ४ फेब्रुवारी १९७४ ला मुंबईत झाला. तिने १९८० मध्ये श्रीराम लागू यांच्या ‘झाकोळ’ चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून काम केले. तर १९८१ मधील ‘कलयुग’ चित्रपटातही बालकलाकार म्हणून तिने काम केले.

१९८३ मध्ये तिला शेखर कपूरच्या ‘मासूम’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करण्‍याची संधी मिळाली. या चित्रपटातील गाणे ‘लकडी की काठी, काठी पे घोडा’ हे गाणे लोकप्रिय बनले. याचदरम्‍यान, उर्मिलाने छोट्या पडद्यावरही काही मालिकांमध्‍ये काम केले.

१९९१ मध्‍ये रिलीज झालेल्या नरसिंहा चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्‍ये पदार्पण केले. या चित्रपटात उर्मिला बॉलिवूडचे दिग्गज कलाकार सनी देओल, डिंपल कपाडिया आणि ओम पूरी यांच्‍यासोबत झळकली. पण तिच्या करियर मधला टर्निंग पॉईंट ठरला ‘रंगीला’ चित्रपट  १९९५ मधील हा चित्रपट दिग्दर्शकराम गोपाल वर्मा यांनी डायरेक्ट केला होता. उर्मिलाने या चित्रपटात आमिर खान आणि जॅकी श्रॉफ यासारख्‍या दिग्गज अभिनेत्‍यांसोबत काम केले. आणि आपल्या दमदार अभिनयाने आपली छाप सोडली.

बॉलिवूडच्या अनेक चित्रपटामध्ये भूमिका साकारत असताना दिग्दर्शक राम गोपाल वर्मासोबत तिच्या रिलेशनशिपच्या चर्चाही गाजल्या. राम गोपाल वर्मा यांनी एका चित्रपटात माधुरी दिक्षितला काढुन उर्मिलाला साईन केले होते, तेव्हापासून त्यांच्या नात्याच्या चर्चेने जोर धरला होता.

उर्मिलाने रामगोपाल यांच्यामुळे इतर दिग्दर्शकांच्या चित्रपटात काम करण्यासाठी टाळाटाळ केली होती. इतर दिग्दर्शकांचेही रामगोपालसोबत पटत नसल्यामुळे त्यांनीही उर्मिलाला नंतर लांबच ठेवले. जेव्हा रामगोपालनेही उर्मिलाला चित्रपटात घेणे बंद केले, तेव्हा तिला दुसऱ्या कोणाचा आधार मिळाला नाही. त्यामुळे तिचे करिअर पुर्णत संपृष्टात आले होते. रामगोपाल वर्मामुळे ती यशोशिखरावर पोहोचली होती. मात्र, तिच्या करिअरला उतरती कळाही त्यांच्यामुळेच लागल्याचे बोलले जाते.

उर्मिला मातोंडकरने ४२ वर्षांची असताना एका काश्‍मीरी बिझनेसमॅनशी लग्‍न केले. उर्मिलाने ३ मार्च, २०१६ रोजी आपल्‍यापेक्षा लहान असणार्‍या मोहसिन अख्तर मीरशी लग्न केले. मोहसिनने जोया अख्तरच्‍या ‘लक बाय चान्‍स’ या चित्रपटात काम केले आहे.

‘दौड’, ‘सत्य’, ‘कौन’, ‘मस्त’, ‘भूत’, ‘प्यार तूने क्या किया’, ‘जंगल’, ‘एक हसीना थी’, ‘जुदाई’,’जानम समझा करो’ हे तिचे काही चित्रपट प्रसिद्ध आहे.