Birthday Special : कॉल सेंटरमध्‍ये काम करत होती अभिनेत्री जरीन खान, ‘या’ अभिनेत्रीमुळे मागे पडले करिअर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची अभिनेत्री जरीन खान हिचा आज वाढदिवस आहे. आज ती ३२ वर्षाची झाली आहे. आजच्या दिवशी तिने एक खुलासा केला. ज्यामध्ये तिने तिच्या करिअरविषयी सांगतले. अनेक चित्रपटामध्ये बोल्ड सिन देणाऱ्या जरीन खानने सलमान खानसोबत ‘वीर’ चित्रपटातून पदार्पण केले. जरीनने अनेक चित्रपटामध्ये काम केले पण तिला यश मिळाले नाही. काही गाण्यांमुळे जरीनची थोडीफार प्रमाणात ओळख निर्माण झाली.

जरीनने एका पोस्टमध्ये लिहले की, ‘मी चित्रपट इंडस्ट्रीत पाऊल ठेवले त्यावेळी माझे वजन खूपच कमी केले होते. परंतू पहिल्या भूमिकेसाठी मला माझे वजन वाढवण्यासाठी सांगितले. वाढवलेल्या वजनामुळे अनेकांनी माझ्यावर टिका केली. पहिल्या चित्रपटानंतर मला कतरिनासारखी दिसणारी अभिनेत्री असे म्हटले जाऊ लागले. त्यामुळे माझ्या अॅक्टींग स्किलकडे कुणाचे लक्ष गेले नाही. या गोष्टीमुळे माझे करिअर मागे पडले.

अभिनेत्री जरीनला डॉक्टर व्हायचे होते. चित्रपटसृष्टीत येण्यापुर्वी ती आपला खर्च स्वतः करत असे. त्यासाठी ती कॉल सेंटरला काम देखील करत होती. जरीनला पहिला चित्रपट मिळण्याची गोष्ट मजेदार आहे. चित्रपट ‘युवराज’ सेटवर सलमानची नजर जरीनवर पडली. त्यावेळी सलमानला ती एखाद्या राजकुमारीसारखी दिसली. नंतर सलमानने तिला वीरसाठी कास्ट केले. त्यावेळी असे म्हटले जात होते की, कतरिनाची झलक जरीनमध्ये दिसत होती. म्हणून तिला कास्ट केले. ‘वीर’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर फारसा चालला नाही.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like