#Birthday SPL : आमिर खाननं केलं होतं ‘असं’ काही ! बाथरूमध्ये तासन् तास रडत बसली होती दिव्या भारती

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार आमिर खान आज आपला 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. आमिर खान आपल्या टॅलेंटसोबतच आपल्या रागासाठीही ओळखला जातो. आज आपण किस्सा जाणून घेणार आहोत जेव्हा एका अभिनेत्रीला त्याच्या रागाची शिकार व्हावं लागलं होतं.

https://twitter.com/30Kumaar/status/1259758786434289665?s=20

आमिर खान ज्या अभिनेत्रीवर नाराज झाला होता त्या अभिनेत्रीचं नाव आहे दिव्या भारती. असं सांगितलं जात आहे की, लंडनमध्ये झालेल्या एका शोमध्ये दिव्या एका चुकीमुळे आणि तिच्या वर्तणुकीमुळे आमिर खान खूप चिडला होता आणि नाराजही झाला होता. त्यानं दिव्यासोबत परफॉर्मंस करण्यास नकार दिला होता.

https://twitter.com/30Kumaar/status/1259758884392177665?s=20

जेव्हा दिव्याला याबाबत विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली होती की, आमिरनं तिची माफी मागावी. दिव्यानं मान्य केलं होतं की, तिची चूक झाली आहे. परंतु तिनं ती कवर केली होती. असंही सांगितलं जात आहे की, आमिरनं ऑर्गनायजर्सला दिव्या ऐवजी जुही चावलाला घेण्याच्या विषयालाही हात घातला होता. नंतर सलमान खाननं दिव्याल सपोर्ट केला आणि छान सादरीकरण केलं.

https://twitter.com/30Kumaar/status/1259758969196773377?s=20

आमिरच्या रागावण्यामुळं दिव्या खूपच हर्ट झाली होती. सादरीकरण झाल्यानंतर दिव्या अनेक तास बाथरूमध्ये बसून रडली होती. आमिर आमिर दिव्याचा हा किस्सा त्यावेळी खूप चर्चेत आला होता.

https://twitter.com/30Kumaar/status/1259759091955765248?s=20