Birthday SPL : खूपच स्टायलिश आहे अभिनेता अल्लू अर्जुन, चालवतो ‘भाईजान’ सलमानपेक्षाही महागडी कार !

पोलीसनामा ऑनलाईन :अभिनेता अल्लू अर्जुन यानं जरी एकाही हिंदी सिनेमात काम नसेल केलं परंतु हिंदी सिनेमाचे चाहते त्याचेही जबरदस्त चाहते आहेत. आज अल्लू अर्जुन आपला वाढदिवस साजरा करत आहे. अल्लूचा जन्म साऊथमधील प्रसिद्ध प्रोड्युसर, डिस्ट्रीब्युटर अल्लू अरविंद यांच्या घरी 8 एप्रिल 1982 रोजी झाला होता. त्याचे काका चिरंजीवी, पवन कल्याण, भाऊ अल्लू सतीश आणि चुलत भाऊ राम चरण साऊथ इंडस्ट्रीतील खूप मोठं नाव आहे.

अल्लू अर्जुननं 2003 साली सिनेमात एन्ट्री केली होती. 17 वर्षांच्या करिअरमध्ये त्यानं फक्त 23 सिनेमा काम केलं आहे. त्याचे अनेक सिनेमे हिट झाले आहेत. काहींना अवॉर्डही मिळाला आहे. सिनेमाची निवड तो खूप सांभाळून करतो.

View this post on Instagram

GRATITUDE !

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline) on

गेल्या वर्षाच अर्जुननं एक ब्रँड न्यू कार खरेदी केली आहे जी जगभरातील महागड्या कारपैकी एक आहे. त्यानं रेंज रोवर ही कार खरेदी केली. एवढी महागडी कार तर सलमान खानच्याही कलेक्शनमध्ये नाही. इंस्टावर त्यानं नव्या गाडीचा फोटोही शेअर केला होता. त्यानं लिहलं होतं की, घरी नवीन कार आली. जेव्हा मी कधी काही खरेदी करतो तेव्हा माझ्या डोक्यात एकच गोष्ट असते ती म्हणजे जीवनाप्रति आभार.

You might also like