#Birthday SPL : ‘जन्नत’मध्ये इम्रान हाशमीसोबत काम करून झाली ‘फेमस’, जाणून घ्या सोनल चौहान सध्या काय करते

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार इम्राान हाशमीसोबत जन्नत सिनेमात काम करणारी अभिनेत्री सोनल चौहान या सिनेमानंतर कोणत्याच सिनेमात दिसली नाही. जन्नतसारख्या सुपरहिट सिनेमात काम करूनही तिला नंतर काम मिळालं नाही. आज आपण सोनच्या वाढदिवसानिमित्त तिचा प्रवास आणि ती काय सध्या काय करते हे आपण जाणून घेणार आहोत.


सोनलचा जन्म 16 मे 1987 रोजी आग्र्यात झाला होता. तिलं पालनपोषण दिल्लीत झालं. नोएडाच्या दिल्ली पब्लिक स्कुलमध्ये तिनं शिक्षण घेतलं. दिल्लीतल्या गार्गी कॉलेजमधून तिनं फिलॉसॉफिमध्ये पदवी घेतली. सर्वात पहिला ऑनस्क्रिन अपीरंस तिनं हिमेश रेशमियाच्या आप का सुरूर गाण्यात दिला होता.

यानंतर ती 2008 साली जन्नत सिनेमात दिसली. पहिल्याच सिनेमात ती फेमस झाली. तिची अॅक्टींग साऱ्यांनाच आवडली. परंतु यानंतर तिला जास्त काम मिळालं नाही. नंतर तिनं साऊथ इंडस्ट्रीत काम करण्याचा निर्णय घेतला. तिनं Cheluveye Ninne Nodalu सिनेमात काम केलं.

यानंतर ती हिंदी सिनेमात कमी दिसली. तिनं 2011 साली बुड्ढा होगा तेरा बाप, नील नितीन मुकेश सोबत 3 जी आणि 2018 मध्ये जेपी दत्ताच्या पलटन सिनेमात काम केलं.

सध्या सोनल साऊथ इंडस्ट्रीत जास्त सक्रिय आहे. ती तुलगू, तमिळ आणि कन्नड सिनेमात काम करते. तिचा लास्ट सिनेमा रूलर हा ही तेलगू सिनेमा आहे.

सोशळ मीडियावर सोनलची मोठी फॅनफॉलोविंग आहे. इंस्टावर तिला तब्बल 2.6 मिलियन लोक फॉलो करतात. आपल्या फोटोंमुळंही ती नेहमीच चर्चेत असते.