Birthday SPL : भगवान दादाच्या एका थप्पडनं खराब झाला होता ‘रामायण’ची ‘मंथरा’ ललिता पवार यांचा डोळा, तरीही ‘असं’ सावरलं करिअर !

पोलिसनामा ऑनलाइन –अनेक दशकं सिनेमात काम करणाऱ्या दिग्गज अभिनेत्री ललिता पवार यांच्या सोबत सिनेमाच्या शुटींदरम्यान एक अपघात घडला. यात त्यांच्या एका डोळ्याला इजा झाली. परंतु करिअरमध्ये याचा त्यांना खूप फायदाही झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

ललिता पवार यांचा जन्म 18 एप्रिल 1916 रोजी नाशिकमध्ये झाला होता. 1942 सालची ही गोष्ट आहे जेव्हा त्या जंग ए आजादी या सिनेमची शुटींग करत होत्या. यावेळी त्यांच्या सोबत जे काही घडलं त्यानं त्यांचं आयुष्यच बदलून गेलं.

ललिता पवार आणि भगवान दादा यांचा थप्पडवाला एक सीन शुट होणार होता. भगवान दादा ललिता पवार यांना थप्पड मारणार होते. भगवान दादा यांनी ललितांना एवढ्या जोरात थप्पड मारली की त्या खाली पडल्या आणि त्यांच्या कानातून रक्त येऊ लागलं. याचा परिणाम असा झाला की, दुर्दैवानं ललिता पवार यांच्या शरीराच्या उजव्या भागाला अर्धांगवायू झाला. त्यांचा उजवा डोळाही आकुंचन पावला. त्यांचा चेहराही बराच खराब झाला.

ट्रेंडसेटर ठरले ललिता पवार यांचे रोल

यानंतर ललिता पवार दीर्घकाळ मनोरंजानाच्या दुनियेपासून दूर होत्या. काही दिवस त्यांनी सिनेमात काम करणं टाळलं. आरोग्यात सुधारणा झाल्यानंतर त्यांनी हार न मानता 1948 मध्ये पुन्हा सिनेमात वापसी केली. त्यांना निगेटीव्ह रोल मिळू लागले. जसं की, कडक सासूची भूमिका. हा एक ट्रेडमार्क बनला जो एक ट्रेंडसेटर ठरला. यानंतर त्यांनी याच जॉनरचे रोल केले.