Birthday SPL : सत्यजीत रे एक असे डायरेक्टर ज्यांच्या सिनेमांची नक्कल करतं ‘हॉलिवूड’ !

पोलिसनामा ऑनलाइन –भारतीय सिनेमांना पाथेर पांचाली, अपराजितो, चारूलता आणि द वर्ल्ड ऑफ असे शानदार सिनेमे देणाऱ्या फिल्मकार सत्यजीत रे यांचा आज वाढदिवस आहे. पद्म भूषण, पद्म विभूषण, भारत रत्न, आणि ऑस्कर अवॉर्डनं सन्मानित निर्माता, दिग्दर्शक, आणि लेखक सत्यजीत रे यांचा जन्मदिवस खूप खास आहे. सत्यजीत यांनी भारतीय सिनेमांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पॉप्युलर तर बनवलंच, शिवाय, अनेक फिल्ममेकर्सना आपल्या कामानं प्रेरीत केलं आहे.

हॉलिवूड डायरेक्टर क्रिस्टोफर नोलान यांनी अलीकडेच सत्यजीत रे यांचा पाथेर पांचाली हा सिनेमा फिल्म मेकिंगच्या इतिसाहातील बेस्ट सिनेमा असल्याचं म्हटलं आहे. नोालानं यांनी जेव्हा हा सिनेमा बघितला तेव्हा त्यांच्या मनात भारतीय सिनेमाबद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त झाली. पाथेर पांचाली सिनेमा मास्टर पीस आहे असंही ते म्हणाले आहेत.

https://twitter.com/30Kumaar/status/1256452690332258309?s=20

फक्त डायरेक्टर नाही एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व

सत्यजीत यांचा अपू ट्रायलॉजी हा वर्ल्ड सिनेातील बेस्ट सिनेमा मानला जातो. ते डायरेक्टर तर होतेच परंतु म्युझिक कंपोजर, कॅलिग्राफर, फिक्शन रायटर, सेट ग्राफिक डिझायनर आणि फिल्म क्रिटिक होते. त्यांनी फक्त भारतीय फिल्ममेकर्सलाच नाही तर मार्टिन स्कॉरसेसे, जेम्स आयवरी, फांसिस फोर्ड कोपोला आणि अकीरा कुरोसावा अशा अनेक इंटरनॅशनल फेमच्या डायरेक्टर्सलाही प्रेरीत केलं आहे.

त्यांच्या स्टोरीवरून प्रेरीत आहेत अनेक सिनेमे

आपल्या पत्नीचे दागिने गहान ठेवून त्यांनी पाथेर पांचाली हा सिनेमा केला होता. हा सिनेमा माईलस्टोन मानला जातो. हॉलिवूडमधील अनेक सिनेमे सत्यजीत रे यांच्या स्टोरीवरून प्रेरीत आहेत असंही सांगितलं जातं आहे. यात टॅक्सी ड्रायव्हर, फोर्टी शेड्स ऑफ ब्लू, ई टी द एक्स्ट्रा टेरेस्ट्रअल असे अनेक सिनेमे आहेत.