Birthday SPL : …म्हणून पहिल्याच सिनेमात पूनमनं शशी कपूरकडून ‘थप्पड’ खाली, व्हायचं होतं ‘डॉक्टर’ परंतु झाली ‘अ‍ॅक्टर’

पोलिसनामा ऑनलाइन –आपल्या सौंदर्यानं प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री पूनम ढील्लन हिचा आज वाढदिवस आहे. पूनमचा जन्म 18 एप्रिल 1962 रोजी झाला होता. आज ती 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. पूनमनं अवघ्या 16 व्या वर्षी मिस इंडिया हा किताब जिंकला होता. यानंतर तिच्या सौंदर्याला आकर्षित होऊन येश चोपडानं तिला त्रिशूल हा सिनेमा ऑफर केला होता. आज आपण वाढदिवसाच्या निमित्तानं काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

https://www.instagram.com/p/B_HAdEjhSyq/

जेव्हा शशी कूपर यांनी पूनम ढील्लनला लगावली थप्पड

तिच्या पहिल्याच त्रिशुल या सिनेमात तिला लिड रोड मिळाला होता. या सिनेमात संजीव कुमार, शशी कपूर आणि अमिताभ बच्चन असे बडे कलाकार होते. यात एका सीनमध्ये शशी कपूर यांना पूनमला थप्पड मारायची होती. अॅक्शन हा शब्द ऐकल्यानंतर पूनम ढील्लनला न सांगताच शशी यांनी जोरात कानशिलात लगावली होती. शश कपूर यांनी असं यासाठी केलं की, जर सांगून केलं असतं तर रिअॅक्शन रियल नसती आली. नंतर मात्र त्यांनी सर्वकाही सांगत पूनमची माफीही मागितली होती.

व्हाययचं होतं डॉक्टर झाली अ‍ॅक्टर

पूनम ढील्लनचा जन्म उत्तर प्रेदशातील कानपूरमध्ये झाला आहे. तिचे वडिल वायुसेनेत एअरक्राफ्ट इंजिनियर होते. तिला डॉकटर व्हायचं होतं परंतु नशीबानं मात्र तिला पहिल्यांदा मिस इंडिया आणि नंतर अभिनेत्री बनवलं.

लव लाईफ

रिपोर्ट्नुसार, 80 च्या दशकात जेव्हा पूनमचे स्टार्स उजळले होते तेव्हा डायरेक्टर राज सिप्पी सोबत तिच्या अफेअरची खूप चर्चा झाली होती. परंतु राज विवाहित होते. पूनमला त्यांच्यासोबत लग्न कराचं होतं. परंतु त्यांना फॅमिली सोडायची नव्हती. नंतर दोघे वेगळे झाले.

लग्नानंतर घेतला घटस्फोट

पूनमनं 1988 साली प्रोड्युसर अशोक ठकेरिया सोबत लग्न केलं. यानंतर तिनं सिनेमात काम करणं कमी केलं. 1992 नंतर 5 वर्ष ती इंडस्ट्रीपासून दूर होती. 1997 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. आता पूनम आपल्या दोन मुलांसह वेगळी राहते.