Birthday SPL : ‘रतलाम’ची ती गायिका जिनं आवाजानं लावलं साऱ्यांनाच वेड ! ‘भाईजान’ सलमानही तिचा ‘फॅन’


पोलीसनामा ऑनलाईन :
हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील एक अशी गायिका आहे जी आपल्या आवाजासोबतच आपल्या सौंदर्यासाठीही फेमस आहे. रतलामच्या मारवाडी कुटुंबात जन्माला आलेली पलक मछाल (Palak Muchhal) एक प्रसिद्ध नाव आहे. पलकचा जन्म 30 मार्च 1992 रोजी झाला आहे. आज ती आपला 28 वा वाढदिवस साजरा करत आहे.

पलकनं सामाजिक कार्यातही कायमच हातभार लावला आहे. 2001 साली झालेल्या गुजरातच्या भूकंप पीडितांसाठी तिनं 10 लाख रुपये जमा केले होते. 9 वर्षांची असताना पलकनं आपला पहिला अल्बम Child for Children काढला होता. Tips म्युझिकनं हा अल्बम रिलीज केला होता.

असं म्हटलं जातं की, सलमान खानदेखील पलकच्या आवाजाचा फॅन आहे. पलक आवाजच नाही तर लुकसाठीही चाहत्यांमध्ये फेमस आहे. तिच्या कुरळ्या केसांचे अनेक दीवाने आहेत. आपल्या सुंदर आणि ग्लॅमरस फोटोंमुळंही पलक अनेकदा चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

‪Life is beautiful! 🌸‬

A post shared by PALAK MUCHHAL (@palakmuchhal3) on

पलकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अनेक अल्बम आणि सिंगल्स रिलीज केल्यानंतर पहिल्यांदा तिनं Damadamm सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला. पहिल्या सिनेमात यश मिळालं नाही तरी पलकनं आपला प्रवास मात्र सुरूच ठेवला. यानंतर तिनं सलमान खानच्या एक था टायगर सिनेमातील गाण्यांना आपला आवाज दिला. यानंतर पलकसाठी एकमागोमाग एक दारं उघडण्यास सुरूवात झाली. पलकनं आशिकी 2, आर राजकुमार, जय हो, गब्बर इज बॅक, प्रेम रतन धन पायो, एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी यांसारख्या अनेक सिनेमांसाठी गाणी गायली आणि आपली योग्यता दाखवून दिली.

View this post on Instagram

@mithoon11 #mtvunplugged

A post shared by PALAK MUCHHAL (@palakmuchhal3) on

View this post on Instagram

“Khamma Ghani” 💛

A post shared by PALAK MUCHHAL (@palakmuchhal3) on

View this post on Instagram

2020 ♥️

A post shared by PALAK MUCHHAL (@palakmuchhal3) on

View this post on Instagram

Gratitude! 🙂

A post shared by PALAK MUCHHAL (@palakmuchhal3) on

View this post on Instagram

Indore here I come! ✈️

A post shared by PALAK MUCHHAL (@palakmuchhal3) on

You might also like