SCO Summit : एकाच छताखाली पीएम मोदी आणि इम्रान ; ना हात मिळवले ना नजर

बिश्केक : वृत्तसंस्था –  पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या शांघाय सहकार्य संघटनेच्या १९ व्या शिखर संमेलनात सहभागी असून किर्गिजस्तानची राजधानी बिश्केक येथे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान देखील या संमेलनात सहभागी झाले आहेत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांनी एकमेकांची भेट घेतली नाही.

डिनरच्या दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि इम्रान खान यांनी एकाच वेळी एंट्री केली तरीही पंतप्रधान मोदी आणि इम्रान खान यांनी एकमेकांना हात मिळवले तर नाहीतच त्याचबरोबर एकमेकांकडे पाहिले देखील नाही.

ही माहिती पाकिस्तानच्या सूत्रांनी दिली आहे. एससीओच्या संमेलनात पंतप्रधान मोदी आणि इम्रान खान यांच्यात कोणतीही भेट होणार नाही. पंतप्रधान मोदींनी संमेलनाला उपस्थित असणाऱ्या सर्व राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली पण पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली नाही. दोन्ही नेते एकाच वेळी सभागृहात एकत्र आले होते. पंतप्रधान मोदी इम्रान खान यांच्या पुढे पुढे चालले होते. तरीही दोघांमध्ये काही चर्चा झाली नाही. एवढेच नाही तर दोघांनी एकमेकांकडे पाहिलेसुद्धा नाही. सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी इम्रान खान पासून फक्त तीन जागांपासून दूर बसले होते. सांस्कृतिक कार्यक्रमात देखील दोघे एकमेकांचे जवळ आले परंतु दोघांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी परिषदेत भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये पाकिस्तानविषयी देखील चर्चा झाली. या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना स्पष्टपणे सांगितले की, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई करत नाही, तोपर्यंत पाकिस्तानसोबत चर्चा केली जाणार नाही.

सिनेजगत

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसोबतच्या नात्याबद्दल दिशा पटानीने केला मोठा खुलासा

…म्हणून ‘तिने’ अनुपम खैरला ‘kiss’ करण्यास दिला होता नकार

आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’