मे जीजस ब्लेस यू… सुनील कांबळेंचा धार्मिक रविवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  ‘मे होली जीजस ब्लेस यू…’अशा शब्दांत कॅन्टोन्मेंट परिसरातील होली एंजल चर्चचे बिशप पॉल दुपारे यांनी सुनील कांबळे यांना शुभेच्छा दिल्या. रविवारच्या प्रार्थनेदरम्यान कांबळे यांनी या चर्चला भेट दिली. यावेळी बिशप पॉल दुपारे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कांबळे यांच्या शुभचिंतनासाठी प्रार्थनाही करण्यात आली. यावेळी फादर अभिषेक पारकर, ठाकूर मदनमोहन, राजन नायर, मोसद कलकटी आणि ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.

एरवी निवांत असलेल्या रविवारच्या दिवशी कॅन्टोन्मेंट परिसरातील धार्मिक स्थळांमध्ये मात्र चांगलीच वर्दळ होती. कॅन्टोन्मेंट परिसरातील होली एंजल चर्च, बाबाजान दर्गा तसेच विविध देवी-देवतांच्या मंदिरांना भाजप-सेना, आरपीआय (ए), रासप, शिवसंग्राम महायुतीचे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुनील कांबळे यांनी रविवारी भेट दिली.

त्यानंतर बाबाजान दर्ग्यात जाऊनही कांबळे यांनी आशिर्वाद घेतले. बाबाजान दर्ग्यात चादर चढवून माथा टेकून कांबळे यांनी आशिर्वाद घेतले. दर्ग्यात सलीम पटेल, नासीर खान यांनी कांबळे यांचे स्वागत केले.

कुरेशी मशीदीपासून सुरू झालेली ही पदयात्रा भोपळा चौक, बाबाजान चौक, सेंटर स्ट्रीट, शितळादेवी, जुना मोदीखाना, एम जी रोड या मार्गे गेली. डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ या पदयात्रेचा समारोप झाला.

या पदयात्रेदरम्यान कांबळे यांनी बुद्धविहारांनाही भेट दिली. तसेच गणपती, मारूती आणि देवीच्या मंदिरात जाऊनही आशिर्वाद घेतले. आरपीआय (ए) च्या कार्यकर्त्यांनी या पदयात्रेत मोठ्या संख्येने भाग घेतला.

यावेळी सदानंद शेट्टी, नगरसेवक दिलीप गिरमकर, नगरसेविका प्रियांका श्रीगिरी, हिमाली कांबळे, शैलेंद्र चव्हाण, राजू श्रीगिरी, भाजपचे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष संतोष इंदूरकर, किरण क्षीरसागर, अमित वोहरा, शैलेश बीडकर, किशोर शिंगवी, साची शिंगवी, पुरुषोत्तम पिल्ले, दीपक कुऱ्हाडे, मनोज भावकर यांच्यासह भाजप, सेना, आरपीआय (ए), रासप, शिवसंग्रामचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सुनील कांबळे म्हणाले, अल्पसंख्यांक असलेल्या समाजाच्या भल्याचाही विचार भाजपप्रणित सरकारने केला आहे. जात-धर्माच्या पलीकडे जाऊन केवळ नागरीक म्हणून सर्वांकडे पाहात सुविधा देण्याचा आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या छत्राखाली भारतीयांना एकत्र आणण्याचा संकल्प करून भाजप काम करीत आहे. त्याला सर्व जाती-धर्माच्या लोकांचा पाठिंबाही मिळत आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like