Bitcoin Case Pune | बिटकॉईन तपासातील सहभागी पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Bitcoin Case Pune | बिटकॉईन बाबत 2018 मध्ये निगडी (Nigdi Police Station) आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Stations) दाखल झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात सायबर तज्ज्ञ (Cyber Expert) पंकज प्रकाश घोडे Pankaj Prakash Ghode (वय – 38 रा. ताडीवाला रस्ता) आणि माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील Ex – IPS Officer Ravindranath Prabhakar Patil (वय – 45 रा. बिबवेवाडी) यांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. घोडे आणि पाटील यांनी बिटकॉईन परस्पर त्यांच्या खात्यात वर्ग करुन घेतल्याचा प्रकार (Bitcoin Case Pune) समोर आला. यानंतर या प्रकरणात केवळ त्या दोघांचाच समावेश नसून तत्कालीन पोलीस अधिकारी देखील यामध्ये सहभागी (Involved) असण्याची शक्यता असून तपासात (Investigation) सहभागी पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी (Police Officers Inquiry) करण्याची मागणी बिटकॉईन गुंतवणूकदारांनी (Bitcoin investors) पत्रकार परिषदेत केली. तसेच यासाठी राज्य सरकारने (Maharashtra State Government) तज्ज्ञांची समिती नेमावी अशी देखील मागणी केली आहे.

 

पत्रकार परिषदेमध्ये गुंतवणूकदारांच्या वतीने हेमंत दवे (Hemant Dave) आणि निशा रायसोनी (Nisha Raisoni) यांनी या संदर्भात माहिती दिली. दवे यांनी सांगितले की, बिटकॉईन प्रकरणात अमित भारद्वाज (Amit Bhardwaj), अजय भारद्वाज (Ajay Bhardwaj) आणि विवेक भारद्वाज (Vivek Bhardwaj) यांचा सहभाग आहे. त्यांनी लाखो बिटकॉईनचा अपहार केला आहे. भारद्वाज बंधूंनी केलेल्या बिटकॉईन चोरीच्या प्रकरणात (Bitcoin Case Pune) त्यांच्यावर पुणे, कोल्हापूर (Kolhapur), मुंबई (Mumbai), नांदेड (Nanded), ठाणे (Thane), नागपूर (Nagpur) येथे 12 गुन्हे (FIR) नोंद आहेत. तसेच देशभरात 42 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. भारद्वाज बंधूंनी 10 बिटकॉईनचा मोबदल्यात 18 बिटकॉईन 18 महिन्यात परत देण्याचा करार करत गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे.

बिटकॉईन गुंतवणूकदारांनी केलेल्या मागण्या

रविंद्र पाटील याने केपीएमजी कंपनी (KPMG Company) सोबत मिळून किती बिटकॉईन चोरले याचा तपास करुन संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करावा.

पाटील याची मालमत्ता जप्त करावी.

बिटकॉइन प्रकरणात उच्चस्तरीय तज्ज्ञांच्या (High Level Experts) चौकशी समिती (Inquiry Committee) नेमावी.

ब्लॅकचेनमध्ये बिटकॉईनचे ट्रान्झॅक्शन अचूकपणे तपासण्यासाठी चैन अ‍ॅनॅलिसीस सॉफ्टवेअरची (Chain Analysis Software) मदत घ्यावी.

 

Web Title :- Bitcoin Case Pune | police officers involved bitcoin investigation should be questioned demand of Hemant Dave Nisha Raisoni

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा