Bitcoin ने मोडले सर्व ‘रेकॉर्ड’ ! एका बिटकॉईन मध्ये घेऊ शकता अलिशान कार

पोलीसनामा ऑनलाईनः सोने दरात होत असलेली घसरण आणि अस्थिरता यामुळे गुंतवणूकदारांनी आपला मार्ग बिटकॉईनकडे वळवला आहे. त्यामुळे बिटकॉईनने गगन भरारी घेतली असून दररोज नवनवे रेकॉर्ड करत आहे. बिटकॉईनने मंगळवारी (दि.16) पहिल्यांदाच 50,000 डॉलरचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. भारतीय चलनात एका बिटकॉईनचे मूल्य 36 लाखांवर गेले आहे. एका बिटकॉईनमध्ये ऑडी क्यू-2 , बीएमडब्ल्डयू एक्स-1, मिनी कूपर आदी अलिशान महागडया मोटारी खरेदी करता येईल एवढे प्रचंड मुल्य वाढले आहे.

जागतिक पातळीवर 16 डिसेंबर रोजी बिटकॉईनने 20000 डॉलरचा टप्पा ओलांडला होता. त्यात गेल्या 2 महिन्यात जवळपास 150 टक्के वाढ झाली आहे. जगभरात सर्वधिक प्रचलित असलेल्या बिटकॉईनचे मूल्य आज न्यूयॉर्कमध्ये 50191 डॉलरवर गेले. भारतीय चलनात याचे मूल्य 36,44,113 रुपये आहे. 2021 मध्ये बिटकॉईनच्या मूल्यात 73 टक्के वाढ झाली आहे. तर वर्षभरात तो 140 टक्क्यांनी वधारला आहे. अवघ्या 2 महिन्यात 21 लाखांनी महाग झालेल्या बिटकाॅईनमधील तेजी सर्वांना थक्क करणारी आहे. काही दिवसांपूर्वी टेस्ला कंपनीचे प्रमुख आणि जगातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या एलन मस्क यांनी बिटकॉईन’मध्ये 1.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली होती. त्यानंतर जगभरात बिटकॉईनचे मूल्य प्रचंड वाढले आहे.

का वाढतोय बिटकॉईनचा भाव
1) गेल्या वर्षभरात बिटकॉईनमध्ये 400 टक्के तेजी.
2) जगभरातील केंद्रीय बँकांचे शून्य व्याजदराला प्राधान्य.
3) कमॉडिटी आणि भांडवली बाजारातील अस्थिरता.
4) मास्टरकार्ड आणि बँक ऑफ न्यूयॉर्क मेलोन कॉर्प यांनी ग्राहकांना क्रिप्टोकरन्सी वापरता यावी यासाठी पावले उचलली आहेत.
5)जगातील सर्वाधिक श्रीमंत आणि टेस्ला कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांच्याकडून 1.5 अब्ज डॉलर्सची बिटकॉईनमध्ये गुंतवणूक.