Bitcoin ETF झाले लाँच, कशी आणि कुठे करू शकता गुंतवणूक; जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : Bitcoin ETF | अमेरिकेत Bitcoin चा पहिला Future बेस्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड सुरू झाला आहे. याच्या लाँचिंगसह Bitcoin ची किंमत 6 महिन्यांच्या उच्च स्तरावर पोहचली. ट्रेडर्सचे म्हणणे आहे की, ETF आल्याने Cryptocurrency मध्ये गुंतवणूक (Bitcoin ETF) वाढेल.

ProShares Bitcoin Strategy ETF ने आंतरराष्ट्रीय एक्सचेंज (Intercontinental Exchange) NYSE Arca वर मंगळवारपासून ट्रेडिंग सुरू केली आहे. US सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनने यास परवानगी दिली होती. Bitcoin Future व्यवहार कमोडिटी फ्यूचर्स ट्रेडिंग कमिशन पहात आहे. तर ETF चे नियंत्रण SEC कडे आहे.

SEC प्रमुख गॅरी जेन्सलर यांनी म्हटले की, Bitcoin ETF खुप उलथा-पालथ होणारी Asset आहे. गुंतवणुकदारांनी खुप विचारपूर्वक गुंतवणूक केली पाहिजे. Bitcoin च्या लिस्टिंगनंतर किंमत वाढून 63337 डॉलरवर पोहचली. त्याने आतापर्यंत 64895 डॉलरचा High गाठला (Bitcoin ETF) आहे.

कसे खरेदी करतात Bitcoin

पारंपारिक चलनासाठी Bitcoin चा व्यवहार केला जाऊ शकतो. डॉलरच्या तुलनेत याचा विनिमय दर संभाव्य गुंतवणुकदारांना आकर्षित करतो. कोणत्याही Bitcoin Exchange द्वारे हे खरेदी करता येते.

2019 च्या अखेरीस बीटकॉईनची किंमत 7 हजार डॉलरच्या जवळपास होती. यानंतर 1 वर्षानंतर हे वाढून 29 हजार डॉलरच्या पुढे गेले. एप्रिल 2021 मध्ये ते 64 हजार डॉलरच्या जवळ पोहचले.

भारतात खरेदी

भारतात Bitcoin च्या खरेदीसाठी अनेक एक्सचेंज आहे. डिजिटल पेमेंट करून हे घेऊ शकता. खरेदीपूर्वी केवायसी अपडेट करावे लागेल. यासाठी आधार कार्ड आणि पॅनकार्ड लागेल. बीटकॉइनची किंमत खुप जास्त असली तरी तुम्ही 500 रुपये सुद्धा यामध्ये गुंतवू शकता. पेमेंट NEFT, RTGS, Debit किंवा Credit Card द्वारे होईल.

कुठे खर्च करू शकता

काही दुकानांवर बीटकॉईनच्या बदल्यात खरेदी करता येऊ शकते. हे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे मिळते. इंटरनेटवरसुद्धा ते एक्सचेंज करून खरेदी करू शकता.

हे देखील वाचा

केवळ 49 रुपयांत मिळतंय Apple Music चे सबस्क्रीप्शन, मिळेल 90 मिलियन गाण्यांची यादी

Shivsena MP Bhavana Gawali | …म्हणून शिवसेना खासदार भावना गवळी आज ED कार्यालयात हजर राहणार नाहीत

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Bitcoin ETF | bitcoin investment in india what is bitcoin how to buy and how transaction works

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update