Bitcoin | 13 वर्षांचे झाले बिटकॉईन, सहा पैशांपासून सुरू केलेला प्रवास पोहचला 48.2 लाखांपर्यंत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Bitcoin | क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) ला नवीन युगाचे सत्य बनवणारे बिटकॉईन (Bitcoin) आता 13 वर्षाचे झाले आहे. या 13 वर्षात बिटकॉइनने असा प्रवास केला आहे, ज्यावर विश्वास ठेवणे कठिण आहे. अवघ्या 6 पैशांच्या दरापासून सुरू झालेला हा प्रवास आता 48.2 लाखाच्या शिखरावर पोहचला आहे.

 

Bitcoin White Paper

 

आजपासून 13 वर्षापूर्वी 31 ऑक्टोबर 2008 ला बिटकॉईनची औपचारिक सुरुवात झाली होती.
त्या दिवशी पहिल्यांदा बिटकॉईनचा व्हाईट पेपर पब्लिश (Bitcoin White Paper) झाला होता.
यास सातोशी नाकामोतो (Satoshi Nakamoto) च्या बनावट नावाने ऑनलाइन पब्लिश करण्यात आले होते.

 

‘बिटकॉइन (Bitcoin) : अ पीअर-टू-पीअर इलेक्ट्रॉनिक कॅश सिस्टम’ शीर्षकाने प्रकाशित व्हाईट पेपरमध्ये सांगण्यात आले होते की,
कशाप्रकारे कोणत्याही सरकारी नियंत्रणाशिवाय भविष्यातील ऑनलाइन पेमेंट प्रणालीद्वारे लोकांना फायदा होऊ शकतो.

 

Most Valuable Cryptocurrency आहे बिटकॉइन

 

सध्या बिटकॉईन सर्वात जास्त व्हॅल्यू असलेली क्रिप्टोकरन्सी (Most Valuable Cryptocurrency) आहे.
जेव्हा तिची औपचारिक सुरुवात झाली होती, तेव्हा तिच्या एका युनिटचा दर अवघा 0.0008 डॉलर (सुमारे सहा पैसे) होता.
आज भारतात बिटकॉइन 64,400 डॉलर (सुमारे 48.2 लाख रुपये) च्या स्तरावर ट्रेड करत आहे.
अशाप्रकारे बिटकॉईनने 13 वर्षाच्या आतापर्यंतच्या आपल्या प्रवासात सहा पैशापासून 48.2 लाखाचा अविश्वसनीय पल्ला गाठला आहे.

 

लिमिटेड आहे Bitcoin Mining

 

बिटकॉईनच्या व्हॅल्यूमध्ये या अविश्वसनीय वाढीच्या पाठीमागे महत्वाचे कारण याच्याशी संबंधीत मुलभूत अटी आहेत.
नाकामोतो ने औपचारिक सुरुवातीच्या वेळीच हे ठरवले होते की, बिटकॉइनच्या युनिटची संख्या कधीही 2.10 कोटीपेक्षा जास्त होऊ शकत नाही.

 

युनिटचा भाव यामुळे प्रचंड वाढला

 

एका रिपोर्टनुसार, ऑगस्ट 2021 पर्यंत मार्केटमध्ये 1.87 कोटी बिटकॉईन युनिट उपलब्ध होते.
अशाप्रकारे आता बिटकॉईनच्या केवळ 23 लाख युनिटची मायनिंग (Bitcoin Mining) केली जाऊ शकते.
पुरवठा मर्यादित असणे आणि मागणी अतिशय असल्याने बिटकॉईनच्या युनिटचा भाव वेगाने वाढला आहे.

 

कुणालाही माहित नाही बिटकॉईनच्या डेव्हलपरचे नाव

 

बिटकॉईनच्या बाबतीत एक रंजक बाब ही आहे की ते डेव्हलप करणार्‍याची गोपनीयता आहे.
आजपर्यंत कुणालाही माहित नाही की बिटकॉईनचे डेव्हलपर सातोशी नाकामोतोची खरी ओळख काय आहे.
नाकामोतोने पेमेंटच्या पद्धतीत क्रांती आणणारे प्रॉडक्ट डेव्हलप करून अवघ्या तीन वर्षानंतर क्रिप्टो मार्केट सोडले.
असे म्हटले जाते की, नाकामोतो 2011 मध्ये क्रिप्टो मार्केटमधून बाहेर पडले.

 

बिटकॉईनच्या इन्व्हेंटरच्या वॉलेटमध्ये 5 लाख कोटी

 

सातोशी नाकामोतोच्या वॉलेटमध्ये (Satoshi Nakamoto Wallet) सध्या 66 बिलियन डॉलर म्हणजे सुमारे 4.97 लाख कोटी रुपयांचे बिटकॉईन टोकन आहेत.
2011 च्यानंतर सुद्धा नाकामोतोच्या वॉलेटचे वजन वाढत गेले. मजेशीर बाब म्हणजे नाकामोतोने यापैकी काहीही खर्च केलेले नाहीत आणि सर्व टोकन विनावापर पडून आहेत.

 

Web Title : Bitcoin | most valuable cryptocurrency bitcoin completes 13 years of launch by satoshi nakamoto

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MLA Gopichand Padalkar | ‘आर्यन खान या नशेबाज पोराला वाचविण्यासाठी ठाकरे सरकारचा आटापिटा’ – गोपीचंद पडळकर

Pune Metro | पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुशखबर ! डिसेंबर अखेर पीसीएमसी ते फुगेवाडी मेट्रो धावणार

Parambir Singh | ‘परमबीर सिंग आदित्य ठाकरेंच्या जवळचे, कुठे पळून गेले त्यांना विचारा’, भाजप आमदाराचा गंभीर आरोप