Birthday SPL : ‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टी एका सिनेमासाठी घेते ‘इतके’ कोटी !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बाहुबली (Baahubali: The Beginning) सिनेमानंतर अभिनेता प्रभास (Prabhas) आणि अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) जगभर फेमस झाले. एसएस राजामौलीनं (S. S. Rajamouli) या सिनेमातून वेगळाच इतिहास रचला. या सिनेमानं कमाईच्याबाबतीतही अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. आज अनुष्का शेट्टी हिचा वाढदिवस आहे. साऊथ सिनेमांसह भारत आणि देशातही ती खूप फेमस आहे. अनुष्काचा जन्म 7 नोव्हेंबर 1981 रोजी झाला आहे.

अनुष्का आपल्या सिनेमातील भूमिकांसाठीही प्रचंड मेहनत घेत असते एका सिनेमासाठी तिनं तब्बल 20 किलो वजन वाढवलं होतं. यानंतर पुन्हा साईज झिरो होण्यासाठी तिला तेवढीच मेहनत घ्यावी लागली होती. साईज हिरो असं या सिनेमांच नाव आहे. हा सिनेमा 2015 साली रिलीज झाला होता.

बाहुबली सिनेमानंतर प्रभास आणि अनुष्काच्या अफेअरच्या चर्चा समोर येताना दिसल्या. अशाही बातम्या समोर आल्या की, दोघंही लवकरच लग्न करणार आहेत.

साऊथ सिनेमात अनुष्काचं नाव हाएस्ट पेड अॅक्ट्रेसच्या यादीत आहे. एका सिनेमासाठी तब्बल 4 कोटी एवढी फी घेते.

अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2015 साली एका तेलगु सिनेमातून तिनं आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती. तिनं बाहुबली सिनेमातून सर्वांना मंत्रमुग्ध केलं होतं. यानंतर ती भानुमती सिनेमात झळकली होती.

https://www.instagram.com/p/BYDh5oRDXVm/

https://www.instagram.com/p/BYDh18oDjFq/