खुशखबर ! ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांना मिळालं होळीचं ‘गिफ्ट’, जुन्या पेन्शन सिस्टीमचा मिळणार ‘लाभ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने हजारो सरकारी कर्मचाऱ्यांना होळीचे गिफ्ट दिले आहे. सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेंशन सिस्टम अंतर्गत पेंशन देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांची नियुक्ती 1-1-2004 पूर्वी झाली होती परंतु त्यांना या तारखेनंतर नोकरीचा पदभार स्वीकारावा लागला होता, असे कर्मचारी नॅशनल पेंशन सिस्टम ऐवजी सेंट्रल सिविल सर्विसेज रुल्स 1972 निवडू शकतात.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की हा आदेश भारत सरकारच्या त्या कर्मचाऱ्यांना लागू होईल ज्यांची नियुक्ती प्रक्रिया 1 जानेवारी 2004 ला पूर्ण झाली होती. असे कर्मचारी सेंट्रल सिविल सर्विसेज (पेंशन) रुल्स, 1972 चा पर्याय निवडू शकतात किंवा जुन्या एनपीएस व्यवस्थेत राहू शकतात.

हजारो कर्मचाऱ्यांची मागणी होणार पूर्ण –
सिंह म्हणाले की पेंशन अ‍ॅण्ड पेंशनर्स वेलफेअर डिपार्टमेंटद्वारे घेण्यात आलेल्या ऐतिहासिक निर्णयाने कर्मचाऱ्यांची बऱ्याच काळापासून सुरु असलेली मागणी पूर्ण होईल, ज्यांची भरती प्रक्रिया तर पूर्ण झाली होती परंतु त्यांना काही कारणाने 1 जानेवारी 2004 नंतर पदभार स्वीकारला होता. ते म्हणाले की हा पर्याय निवडण्याची अंतिम तारीख 31 मे 2020 आहे. जे कर्मचारी हा पर्याय निवडणार नाहीत त्यांना एनपीएस कवर अंतर्गत रहावे लागेल.

अनेक प्रकरणं न्यायालयात प्रलंबित –
केंद्र सरकारच्या आदेशाने लाखो कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा केला आहे. ज्यांनी लेखी परिक्षा, मुलाखत आणि निकाल 1 जानेवारी 2004 पूर्वी प्रकाशित होईल. त्यांना काही कारणाने नोकरीवर रुजू होण्यास जास्त कालावधी लागला. केंद्र सरकारने 1-1-2004 पेक्षा जुन्या पेंशन स्किमच्या ऐवजी नवी पेंशन सिस्टम लागू केली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाने लाखो कर्मचाऱ्यांना लाभ होईल.