Aadhaar Card : तुमचा आधार कार्डवरील फोटो खराब आहे का? जाणून घ्या तो बदलण्याची प्रोसेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  बहुतांश लोक आपल्या आधार कार्डवरील फोटोबाबत समाधानी नसतात. आधार कार्डच्या फोटोवरून अनेक लोकांची थट्टा सुद्धा केली जाते. पण आता हे ऐकून तुम्हाला आनंद होईल की, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (युआयडीएआय) आधार कार्डधारकांना आधार कार्डवरील आपला फोटो अपडेट करण्याची परवानगी दिली आहे. कार्डधारक आपल्या जवळच्या आधार नावनोंदणी केंद्रावर जाऊन हा बदल करू शकतात.

आधार कार्डचा फोटो बदलण्याची ही आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेस

स्टेप 1. सर्वप्रथम यूआयडीएआयची वेबसाइट uidai.gov.in वर लॉग इन करा आणि आधार नावनोंदणी फॉर्म डाऊनलोड करा.

स्टेप 2. हा आधार नावनोंदणी फॉर्म भरून जवळच्या आधार नावनोंदणी केंद्रावर जमा करा.

स्टेप 3. आता आधार नावनोंदणी केंद्रावर कर्मचारी तुमचे बायोमेट्रिक डिटेल घेईल.

स्टेप 4. आता आधार नावनोंदणी केंद्राचा कर्मचारी तुमचा फोटो घेईल.

स्टेप 5. आता आधार नामांकन केंद्राचा कर्मचारी शुल्क म्हणून 25 रुपये+जीएसटी घेऊन तुमच्या आधार कार्डवरील फोटो अपडेट करेल.

स्टेप 6. आधार नावनोंदणी केंद्राचा कर्मचारी तुम्हाला यूआरएनसह एक स्लिप सुद्धा देईल.

स्टेप 7. तुम्ही या यूआरएनचा उपयोग करून हे चेक करू शकता की तुमचा आधार कार्डचा फोटो अपडेट झाला आहे किंवा नाही.

स्टेप 8. आधार कार्ड फोटो अपडेट झाल्यानंतर, नवीन फोटोसह एक अपडेटेड आधार कार्ड युआयडीएआयच्या वेबसाइटवरून डाऊनलोड करता येऊ शकते.