Aadhaar PVC Card : केवळ 50 रुपयांत ऑर्डर करा नवीन वैशिष्ट्यांनं सुसज्ज नवीन आधार कार्ड, जाणून घ्या फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   आधार कार्ड हे विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, नवीन सिमकार्ड घेण्यास, बँकांमध्ये खाती उघडण्यासाठी आणि मुलांच्या प्रवेशासह विविध प्रकारच्या कामांसाठी एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. हे अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणूनही वापरले जाते. मात्र, पूर्वी आपल्या पत्त्यावर प्राप्त केलेले आधार कार्ड आकारात बरेच मोठे होते आणि ते नेहमीच सोबत ठेवणे सोपे नव्हते. आता 12-आकडी ओळख क्रमांक जारी करणार्‍या संस्थेच्या युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) पॉलिव्हिनायल क्लोराईड (पीव्हीसी) कार्डवर आधार पुनर्मुद्रण करण्यास परवानगी दिली आहे. आपण आपल्या वॉलेटमध्ये नवीन डेबिट किंवा क्रेडिट कार्ड प्रमाणेच नवीन आधार कार्ड सहज ठेवू शकता. यूआयडीएआयने ट्वीट करून म्हटले की, “आता तुमचा आधार अशा आकारात आला आहे, जो तुम्ही तुमच्या पाकीटात ठेवता येईल .”

यूआयडीएआयने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आता तुम्ही नवीन आधार पीव्हीसी कार्ड मागवू शकता, जे फार काळ टिकून राहते, ते आकर्षक असून आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सज्ज आहे. या सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये एक होलोग्राम, Guilloche पॅटर्न, Ghost Image आणि मायक्रोटेक्स्ट समाविष्ट आहे. ” या नवीन पीव्हीसी कार्डसाठी तुम्हाला यूआयडीएआयला नाममात्र शुल्क भरावे लागेल. नवीन पीव्हीसी कार्डमध्ये चांगले मुद्रण आणि लॅमिनेशन गुणवत्ता असल्याचे युआयडीएआयने नमूद केले आहे. तसेच हे अधिक टिकाऊ असेल. कार्डची सत्यता क्यूआर कोडद्वारे त्वरित पुष्टी केली जाईल. युआयडीएआयने सांगितले की, पावसात नवीन कार्डे खराब होण्याची भीती राहणार नाही.

आपण नवीन आधार पीव्हीसी कार्डसाठी अशा प्रकारे करू शकता अर्ज:

1. आपण यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटद्वारे आधार पीव्हीसी कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

२. आता ‘ My Aadhaar Section’ अंतर्गत ‘ Order Aadhaar PVC Card ‘ वर क्लिक करा.

3. यानंतर, 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी ईआयडी प्रविष्ट करा.

4 . आता चित्रात दर्शविलेले सुरक्षा कोड किंवा कॅप्चा कोड प्रविष्ट करा.

5 . मग ‘ Send OTP ‘ वर क्लिक करा.

6 . नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर तुम्हाला ओटीपी मिळेल.

7 . आता ओटीपी एन्टर करा आणि नंतर सबमिट करा.

8 . सबमिट केल्यानंतर तुम्हाला पीव्हीसी कार्डाची प्रीव्यू कॉपी मिळेल.

9. यानंतर, पेमेंट पर्यायावर क्लिक करा. यानंतर 50 रुपये द्या.

10. आधार पीव्हीसी कार्ड पेमेंटसह ऑर्डर केले जाईल.