भारताच्या अर्थव्यवस्थेची रिकव्हरी ’V’ आकार ऐवजी ’U’ किंवा ’W’ आकारात : विश्लेषक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   विश्लेषकांचे म्हणणे आहे की, भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा ’व्ही’ आकारा ऐवजी ’यु’ किंवा ’डब्ल्यू’ आकारात आहे, कारण कोरोना व्हायरसने प्रभावित भारत एक असा देश आहे, जो महामारीच्या अगोदरसुद्धा विकासासाठी संघर्ष करत होता. सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चने सोमवारी एका रिपोर्टमध्ये म्हटले, कोरोना व्हायरसच्या सुरूवातीच्या अगोदर भारताची जीडीपी ग्रोथ 4.5 टक्केपर्यंत मंद झाली होती.

सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चने रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारताने कोरोना व्हायरस संसर्गाला रोखण्यासाठी योग्य धोरण अवलंबून लवकरच लॉकडाऊन सुरू केले, यामुळे संसर्ग सर्वोच्च पातळीवर जाण्यास उशीर झाला. परंतु, इकॉनॉमिक रिकव्हरी खुपच मंद झाली. मागील दोन वर्षांची ग्रोथ पाहता सरकारजवळ अर्थव्यवस्थेत मागणी वाढवण्यासाठी मर्यादित स्त्रोत आहेत. आम्हाला वाटते की, भारतात कोरोनाचा प्रभाव गंभीर होईल आणि अर्थव्यवस्थेतील सुधारणा व्ही आकारात न होता, यू किंवा डब्ल्यू आकारात होईल. आर्थिक मंदी आणि रिकव्हरी नेहमी सामान्यपणे यू, व्ही किंवा डब्ल्यू आकारात होते.

काय सांगतो व्ही आणि डब्ल्यू आकार

व्ही आकाराच्या मंदीची सुरूवात एका मोठ्या घसरणीसह होते, परंतु सुधारणा सुद्धा वेगाने होते. डब्ल्यू आकाराची मंदी व्ही आकाराच्या मंदीच्या वेगानेच सुरू होते, परंतु मध्येच पुन्हा एकदा रिकव्हरी येते आणि पुन्हा मंदी येते. यानंतर वेगाने रिकव्हरी होते. यास डबल-डिप मंदीसुद्धा म्हणतात. कारण यामध्ये अर्थव्यवस्था पूर्णपणे रिकव्हर होण्याअगोदर दोनवेळा घसरते.

काय सांगतो यू आकार

तर, यू आकाराच्या रिकव्हरीत सुरूवात वेगवान घसरणीसह होते. नंतर थोडी स्थिर होते आणि पुन्हा वेगाने रिकव्हरी होते. हे जवळपास व्ही आकारच्या रिकव्हरी प्रमाणे होते. फरक केवळ एवढाच आहे की, यात मध्येच थोडा विराम येतो. सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चच्या रिपोर्टनुसार, भारत लवकर लॉकडाऊनमध्ये गेल्याच्या कारणामुळे संसर्ग सर्वोच्च पातळीवर जाण्यास उशीर झाला.