‘ही’ व्यक्ती देशातील सर्वात श्रीमंत CEO, 3100 कोटी रूपयांहून अधिक संपत्तीचा ‘मालक’

नवी दिल्ली : रिटेल चेन डीमार्ट चालवणारी पॅरेंट कंपनी Avenue Supermarts अ‍ॅव्हेन्यू सूपर मार्केटचे सीईओ Ignatius Navil Noronha भारतातील सर्वात श्रीमंत नॉन-प्रमोटर सीईओ आहेत. 2006 पासून एव्हेन्यू सुपरमार्ट्सचे एमडी आणि सीईओ नोरोन्हा यांच्याजवळ 3,128 करोड रूपयांची संपत्ती आहे. कंपनीचे संस्थापक राधाकिशन दमानी आता देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. दमानी यांच्याकडे 17.8 अरब डॉलरची संपत्ती आहे आणि ते देशातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या पाठीमागे आहेत.

दूसर्‍या स्थानावर HDFC Bank चे सीईओ आदित्य पुरी
इंग्रजी वृत्तपत्र द इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार डीमार्टचेच सीएफओ रमाकांत बहेती टॉप प्रोफेशनल्सच्या यादीत तिसर्‍या स्थानावर आहेत. त्यांच्याकडे 666 करोड रुपयांचे शेयर आहेत. या यादीत एचडीएफसी बँकेचे एमडी आणि सीईओ आदित्य पुरी 943 करोड रुपये किंमतच्या संपत्तीसह दुसर्‍या स्थानावर आहेत.

टेक महिन्द्राचे एमडी आणि सीईओ सीपी गुरनानी यांची एकुण संपत्ती 594 करोड रुपये आहे आणि ते या यादीत चौथ्या स्थानावर आहेत. एचडीएफसीचे एमडी रेणु सूद कर्नाड यांची एकुण संपत्ती 547 करोड रुपये आहे. एचडीएफसीचे चेअरमन दीपक पारेख यांच्याजवळ 273 करोड रुपयांची संपत्ती आहे. या यादीत कोटक बँकचे तीन अधिकारी सुद्धा आहेत.

सध्या अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्टसचे शेयर तेजीत आहेत. यामुळे कंपनीचे वरील अधिकारी आणि प्रमोटर्सच्या संपत्तीत जबदस्त वाढ झाली आहे.