Bank Holiday’s in February : फेब्रुवारीत बँकेत जाण्यापूर्वी जाणून घ्या केव्हा-केव्हा आहे सुट्टी, अन्यथा रखडू शकते काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   प्रत्येक महिन्याप्रमाणे फेब्रुवारीमध्ये सुद्धा बँका काही दिवसांसाठी बंद राहणार आहेत. जर तुम्ही अगोदरच प्लॅन करून ठेवला असेल की, फेब्रुवारीत कोणकोणत्या दिवशी बँकेचे कामकाज उरकायचे आहे तर बँकेच्या शाखेत जाण्यापूर्वी एकदा फेब्रुवारीचे हॉलिडे कॅलेंडर आवश्य पहा. कारण ज्यादिवशी तुम्ही बँकेत जाल त्या दिवशी बँक बंद असू शकते.

फेब्रुवारीमध्ये बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांच्या सणांच्या आधारावर आहेत. फेब्रुवारी महिन्यात बँकांना जास्त सुट्ट्या नाहीत.

अशा आहेत सुट्ट्या…

* 12 फेब्रुवारीला सिक्किमच्या बँकांमध्ये सुटी आहे, या दिवशी सोनम लोसार निमित्त बँका बंद राहतील.

* 13 फेब्रुवारीला महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.

* 15 फेब्रुवारीला मणिपुरच्या बँका लुई नगाई नी निमित्त बंद राहतील.

* 16 फेब्रुवारीला वसंत पंचमी असल्याने यादिवशी पंजाब, हरियाणा, उडीसा, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये बँका बंद राहतील.

* 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती असल्याने महाराष्ट्रातील बँका बंद राहतील.

* 20 फेब्रुवारीला मिझोराम आणि अरुणाचलच्या बँका बंद राहतील.

* 26 फेब्रुवारीला हजरत अली जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशच्या बँकांना सुटी असेल.

* 27 फेब्रुवारीला गुरु रविदास जयंतीनिमित्त चंडीगढ, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि पंजाबच्या बँका बंद राहतील.

रविवारशिवाय बँका दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात.