सलग 3 दिवस ‘बंद’ राहतील बँका, पुढच्या महिन्यात होणार ‘संप’, वेळेत काम उरकून घ्या अन्यथा होईल ‘खोळंबा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्व सरकारी आणि खासगी बँका आजपासून तीन दिवस बंद राहणार आहेत. इतकेच नाही तर पुढच्या महिन्यातही बँकांना सुट्ट्या असतील. त्यामुळे तुमची बँकिंगची कामे वेळेवर पूर्ण करायची असतील तर तुम्हाला बँकेच्या सुट्ट्या लक्षात घ्याव्या लागतील. महाशिवरात्रीमुळे आज शुक्रवारी बँका बंद आहेत. तसेच उद्या चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील आणि रविवारी तर सुट्टीच असते. अशा प्रकारे सलग तीन दिवस बँकांची कामे बंद असतील. ज्या लोकांचे बँकेसोबत दररोजचे व्यवहार चालतात अशा लोकांसाठी ही एक त्रासदायक बाब ठरणार आहे.

पुढील महिन्यात म्हणजेच मार्च २०२० मध्ये बँकांचा संप असणार आहे. बँकांचा हा संप ११ ते १३ मार्च दरम्यान राहील. परंतु हा संप ग्राहकांसाठी त्रासदायक ठरणार आहे. कारण हा संप बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या तीन दिवशी असणार आहे.

या संपाच्या आधी ७ आणि ८ मार्चला देखील बँका बंद असणार आहेत. कारण ७ मार्चला दुसरा शनिवार आहे तर ८ मार्चला रविवार. यानंतर बँक फक्त २ दिवसांसाठी उघडतील आणि नंतर संप चालू होईल. तीन दिवसांच्या संपानंतर बँक केवळ १ दिवस म्हणजेच फक्त १४ मार्च ला चालू राहतील नंतर पुन्हा रविवारी बंद असणार. शिवाय १० मार्चला देखील होळीच्या निमित्ताने सुट्टी राहील.

बँकांच्या या सुट्ट्यांमुळे ग्राहकांची चेक क्लियरेन्स सारखी महत्वाची कामे थांबू शकतात. आपली बँकिंग कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी ग्राहकांनी बँकेच्या सुट्ट्या ध्यानात घेऊन कामे उरकून घ्यावीत.

You might also like