कामाची गोष्ट ! सणासुदीत नाही भासणार रोख रक्‍कमेचा तुटवडा, बँकांनी ‘हा’ मार्ग अवलंबला, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सणांच्या वेळी ग्राहकांकडे रोख रक्कम मिळण्यासाठी सरकारी बँकांनी ‘लोन मेळावा’ सुरू केला आहे. त्याचबरोबर, खासगी क्षेत्रातील बँका सोप्या अटींवर विविध ऑफरची कर्जे देत आहेत. या माध्यमातून बँका ग्राहकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सणाच्या हंगामात मागणी वाढविण्याच्या मोहिमेमध्ये विविध क्षेत्रातील कंपन्यांसह बँकासुद्धा सहभागी झाल्या आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गुरुवारी देशभरातील 226 ठिकाणी लोन मेळावा आयोजित करण्याचा कार्यक्रम जाहीर केला. खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने ‘कोना-कोना ख्वाब’ नावाचा कर्ज महोत्सव सुरू केला आहे. या कर्ज योजनेंतर्गत बँक विविध प्रकारच्या कर्जावर प्रक्रिया आणि मुदतीपूर्वी (संपूर्ण कर्जाची परतफेड) शुल्कात 25% ते 100% सवलत देत आहे. वाहन कर्जासाठी बँकेने ‘बाय नाऊ पे लेटर’ ऑफर दिली असून, पुढील वर्षी जानेवारीपासून खरेदीनंतर ईएमआय सुरू होईल.

कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष (ग्राहक बँकिंग) शांती एकंबरम यांनी सांगितले की, बँक ग्राहकांवर विश्वास वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. देशांतर्गत अर्थव्यवस्थेत मागणी वाढविण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली गेली आहे. बँकेच्या या सर्व ऑफर देशभरात 3,500 पॉईंटवर उपलब्ध असतील.

सणांच्या हंगामात बँक महिलांसाठी अतिरिक्त ऑफर देत आहे. महिलांना नवीन कर्जावरील व्याजात 0.25 ते 0.5 टक्क्यांपर्यंत सूट देण्याची ऑफरही बँकेने दिली आहे. सणासुदीच्या हंगामात बँकेकडे शेतीपासून लहान व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांपासून ग्राहकांना कित्येक ऑफर आल्या आहेत.

तीन दिवसांपूर्वी एचडीएफसी बँकेनेही सणासुदीच्या हंगामात ग्राहकांना कर्जावर अनेक सवलती देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. अलीकडेच शासकीय आणि खासगी बँकांशी झालेल्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मागणी वाढविण्यासाठी आपापल्या स्तरावर काम करण्याचे आवाहन केले होते.

visit : Policenama.com