खूशखबर ! सरकार देशात उभारणार 75 नवे ‘मेडिकल’ कॉलेज, ‘या’ क्षेत्रात 100% ‘FDI’ ला मंजूरी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मेडिकल कॉलेज उभारण्यासंबंधित अतंत्य महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाअंतर्गत सरकार देशभरात 75 मेडिकल कॉलेज उभारणार आहे, त्यासाठी जवळपास 24 हजार कोटी रुपयांच्या खर्च सरकारकडून करण्यात येणार आहे. यामुळे देशात मेडिकलच्या जागा देखील वाढणार आहेत.

75 मेडिकल कॉलेज आणि 15,700 जागा –
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठक पार पडल्यानंतर या निर्णयाबाबतची महिती देण्यात आली. या बैठकीत मेडिकल कॉलेज उभारणीसह अनेक निर्णय घेण्यात आले. या बैठकीत घेतलेल्या निर्णयानंतर देशात नवे 75 मेडिकल कॉलेज उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यासाठी जवळपास 24 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यात एमबीबीएसच्या 15,700 नव्या सीट देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे हे मेडिकल कॉलेज अशा जिल्हात सुरु करण्यात येतील जेथे मेडिकल कॉलेज नाहीत.

या क्षेत्रात 100 टक्के FDI –
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी बैठकीनंतर सांगितले की, सरकार देशात जास्त परकीय थेट गुतंवणूक आणण्याचा प्रयत्न करत आहे, खानीकर्म क्षेत्रात 100 टक्के परकीय थेट गुंतवणूकीला मान्यता देण्याचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

ते म्हणाले, मागील 5 वर्षात सरकारने FDI वर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. ज्यामुळे भारतात मागील 5 वर्षात 286 बिलियन डॉलरची परकीय गुंतवणूक भारतात आली.

कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेले इतर महत्वाचे निर्णय –
1.
काॅन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 100 टक्के FDI ला मंजूरी.
2. डिजीटल मिडियात 26 टक्क्यापर्यंतच्या FDI ला मंजूरी.
3. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 6268 कोटी रुपयांची सब्सिडी मंजूर.
4. एक्सोर्टला स्थानिक स्त्रोतांशी (लोकल सोर्सिंग) जोडले जाईल.
5. पहिल्या ऑनलाइल स्टोर सुरु करण्यास सूट.