खुशखबर ! भारतातील ‘या’ 2 मोठया बँकांनी केले व्याजदर कमी, कमी होईल तुमचा EMI, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  –   कॅनरा बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रने सोमवारी एमसीएलआर दरात अनुक्रमे 10 बेस पॉईंट आणि 20 बेस पॉईंटने कपात करण्याची घोषणा केली असून ते 7 जुलैपासून लागू होतील. बंगलोरस्थित कॅनरा बँकेने आपले एक वर्षाचे एमसीएलआर 7.65 टक्क्यांवरून 7.55 टक्क्यांवर आणले आहे. एक रात्र आणि एका महिन्याच्या दरात 10 बेस पॉईंटने कपात केली आहे, त्यातील प्रत्येक 7.20 टक्क्यांवर आला आहे. कॅनरा बँकेने एमसीएलआर सुधारित 7.55 टक्क्यांवरून 7.45 टक्के केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने (बीओएम) एक वर्षाचा एमसीएलआर 7.70 टक्क्यांवरून 7.50 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे.

एक-रात्र, एक महिन्याचा आणि तीन महिन्यांचा एमसीएलआर अनुक्रमे 7.20 टक्क्यांवरून 7 टक्के, 7.30 टक्क्यांवरून 7.10 टक्के आणि 7.40 टक्के ते 7.20 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने सहा महिन्यांचा एमसीएलआर 7.50 टक्क्यांवरून 7.30 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे.