Flipkart, Paytm, Ola आणि Swiggy सह ‘या’ भारतीय कंपन्यांमध्ये लागलाय चीनचा पैसा, जाणून घ्या पूर्ण माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  चीनसोबतच्या सीमा वादानंतर भारत सरकारने टिक-टॉक, कॅमस्कॅनर आणि लायकीसह 59 चीनी अ‍ॅप्सवर प्रतिबंध लावला आहे. देशभरात चीनविरूद्ध जबरदस्त संताप आहे. अनेक संघटनांनी चीनमध्ये निर्मित वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहिम सुरू केल्याचे दिसत आहे. भारत सरकारने सुद्धा चीनी वस्तूंची आयात कमी करण्यासाठी अनेक प्रकारची पावले उचलली आहेत. तरीही भारताच्या अर्थव्यवस्थेत चीनची मुळे खुप खोलवर गेली असल्याचे दिसत आहे. भारताच्या प्रमुख स्टार्टअप कंपन्यांमध्ये चीनी कंपन्यांकडून मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे.

गेटवे हाऊसच्या आकड्यांनुसार, बिग बास्केट ब्रँड नावाने ग्रोसरीशी संबंधिात ई-कॉमर्स पोर्टल चालवणारी इनोव्हेटिव्ह रिटेल कॉन्सेप्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत अलीबाबा ग्रुपने गुंतवणूक केली आहे. लर्निंग अ‍ॅप बायजूजचे संचालनक करणारी कंपनी थिंक अँण्ड लर्न प्रायव्हेट लिमिटेडमध्ये टेन्सेंट होल्डिंगजने गुंतवणूक केली आहे. तर, वॉलमार्टची मालकी असणारी कंपनी फ्लिपकार्टमध्ये चीनच्या स्टीडव्यू कॅपिटल आणि टेन्सेंट होल्डिंगने 30 कोटी डॉलरपर्यंत गुंतवणूक केली आहे. ट्रॅव्हल पोर्टल मेक माय ट्रीपचे संचालन करणारी कंपनी मेक माय ट्रीप इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये चीनच्या सीट्रीपने गुंतवणूक केली आहे.

पेटीएम डॉट कॉमचे संचालन करणारी वन97 कम्युनिकेशन्स लिमिटेडमध्ये अलीबाबा समूहाने 40 कोटी डॉलरीची गुंतवणूक केली आहे. तर, पेटीएम मॉल चालवणार्‍या पेटीएम ई-कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडने 15 कोटी डॉलरपर्यंतची गुंतवणूक केली आहे.

गेटवे हाऊसच्या आकड्यांनुसार, कॅब अग्रिगेटर ओलाचे संचालन करणारी एएनआय टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेमध्ये टेन्सेंट होल्डिंग, स्टीडव्यू कॅपिटल, सेलिंग कॅपिटल अ‍ॅण्ड चायना, इटर्नल यील्ड इंटरनॅशनल लिमिटेड, चायना-यूरेशियन इकॉनॉमिक को-ऑपरेशन फंडकडून गुंतवणूक करण्यात आली आहे. ओयोचे संचालन करणारी ओरावल स्टेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये दिदी चुक्सींग आणि चायना लॉजिंग ग्रुपची इन्व्हेस्टमेंट आहे.

पॉलिसी बझारमध्ये ईटेक असेस मार्केटींग अ‍ॅण्ड कन्सल्टींग प्रायव्हेट लिमिटेडने गुंतवणूक केली आहे. तर, झोमोटोमध्ये सुद्धा अलिबाबा ग्रुपने गुंतवणूक केली आहे.