‘ही’ कंपनी देणार 1000 लोकांना नोकरी, जाणून घ्या तुम्हाला मिळू शकते संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या कोरोना आणि त्यामुळे आलेले आर्थिक संकट यात नोकरी मिळणे हे खूप कठीण झाले आहे. आणि अशातच कॅश मॅनेजमेंट सर्व्हिस (CMS) ही कंपनी एक हजार कर्मचाऱ्यांची भरती घेणार आहे. कंपनीने येत्या दोन महिन्यात भरती प्रक्रिया पूर्ण करणान्याची योजना आखली आहे. ही कंपनी पुढील काळात आपल्या स्वभागीदार बँक, विना बँक वित्तीय कंपनी (NBFC) आणि छोट्या आर्थिक संस्थानांसाठी नगद वसुलीच्या कामात देखील उतरणार आहे.

यावेळी कॅश मॅनेजमेंट सर्व्हिस (CMS) कंपनीच्या रोख व्यवहार विभागाचे उपाध्यक्ष अनुष राघवन म्हणाले की सिएमस ही कंपनी एनबीएफसी च्या सेवांना लोकांपर्यंत पोहचवत आली आहे. आणि येत्या काळात आम्ही वरिष्ठ नागरिकांसाठी बँकिंग सेवा सोबतच यात्रा, शिक्षण या सर्वांसाठी घरापर्यंत जाऊन चेक तसेच नगद व्यवहार करण्याचा विचार करत आहोत. आणि यासाठीच येत्या दोन महिन्यात आम्ही एक हजार लोकांची भरती घेऊन त्यांना लवकरात लवकर नियुक्त करन्याचा विचार केला आहे. राघवन म्हणाले की, नगद वसुली सेवा ही प्रामुख्याने ग्रामीण व अर्धशहरी भागांसाठी आहे कारण अजूनही या भागामध्ये रोख व्यवहार मोठ्या प्रमाणात चालतात.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like