‘कोरोना’ संकटात दिलासा देणारी बातमी, देशाचा परकीय चलन साठा पोहचला व्रिकमी उच्च स्तरावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस महामारी आणि लॉकडाऊनच्या प्रतिबंधांमुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेसाठी एक चांगली बातमी आहे. भारताचा परकीय चलन साठा (foreign exchange reserves) आतापर्यंतच्या उच्चतम स्तरावर पोहचला आहे. भारताचा परकीय चलन साठा 555.12 बिलियन डॉलरच्या रेकॉर्ड स्तरावर पोहचला आहे. 16 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्यात 3.615 बिलियन डॉलरची वाढ झाली आहे, ज्यामुळे हा उच्चतम स्तरावर पोहचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकड्यातून ही माहिती मिळाली आहे.

याच्या अगोदरच्या आठवड्यात अर्थात 9 ऑक्टोबर 2020 ला संपलेल्या आठवड्यात देशाच्या परकीय चलन साठ्यात 5.867 बिलियन डॉलरची वाढ नोंदली गेली होती, ज्यामुळे तो 551.505 बिलियन डॉलरवर आला होता. पुनरावलोकन कालावधी दरम्यान देशाच्या परकीय चलन साठ्यात या वाढीचे मुख्य कारण परकीय चलन मालमत्तेत (FCA) वेगाने झालेली वाढ आहे. एफसीए एकुण परकीय चलन साठ्याचा महत्वपूर्ण भाग असतो. पुनरावलोकन कालावधीत एफसीएमध्ये 3.539 बिलियन डॉलरची वाढ झाली, ज्यामुळे तो वाढून 512.322 बिलियन डॉलर झाला.

भारतीय रिझर्व्ह बँकेनुसार, पुनरावलोकन कालावधी दरम्यान भारताच्या एकुण सुवर्ण साठ्यात 86 मिलियन डॉलरची वाढ झाली, ज्यामुळे तो वाढून 36.685 बिलियन डॉलर झाला.

आकड्यांनुसार, या कालावधीत अंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जमा भारताच्या परकीय चलन साठ्यात 11 मिलियन डॉलरची घट झाली, ज्यामुळे तो कमी होऊन 4.634 बिलियन डॉलरवर आला. तर, अंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सोबत विशेष आहरण अधिकार पुरावलोकन आठवड्याच्या दरम्यान 1.480 बिलियन अमेरिकी डॉलरवर अपरिवर्तित राहीला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like