Johnnie Walker पुढील वर्षापासून कागदांच्या बाटलीत ‘व्हिस्की’ची विक्री, ‘हे’ आहे कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जगातील सर्वात मोठी दारू उत्पादक कंपनी जॉनी वॉकरने मोठी घोषणा केली आहे. जॉनी वॉकर स्कॉच व्हिस्की 2021 च्या सुरुवातीपासून प्लास्टिकच्या बाटलीमध्ये उपलब्ध होणार नसल्याची घोषणा कंपनीने केली आहे. Diageo plc ने सोमवारी ही माहिती दिली. प्लॅस्टिक कचरा रोखण्याच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात मोठी दारू उत्पादक कंपनी जॉनी वॉकरने हे पाऊल उचलले आहे.

Guinness And Tanqueray Gin यांनी सांगितले की, ही नवीन बाटली व्हेंचर मॅनेजमेंट कंपनीच्या सहकार्याने तयार केली जाणार आहे. ही बाटली बनवण्यासाठी लाकडाचा लगदा वापरला जाणार आहे. फूड ग्रेड स्टँडर्सची काळजी घेतली जाणार असून तयार करण्यात आलेल्या बाटलीचा पुनर्वापर केला जाऊ शकतो.

Diageo आणि पायलट लाइट यांनी पेपर बाटल्यांचे संशोधन आणि बनवण्यासाठी पॅल्पेक्स लिमिटेड नावाची एक कायमस्वरुपी पॅकेजिंग कंपनी सुरु केली आहे. Pulpex, लिप्टन टीम निर्माता युनिलिव्हर पीएलसी आणि सोडा मेकर पेप्सीको या कंपन्यांकरिता पल्पपेक्स ही कंपनी स्पर्धात्मक श्रेणीतील कंपन्यांसाठी बाटल्या बनवणार आहे. ही बाटली पुढील वर्षी बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ग्राहकांच्या उत्पादक कंपन्या पॅकेजिंग फूड आणि इतर घरगुती वस्तूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वापरावर तपासणी करण्यात येत आहे. उदाहरणार्थ, युरोपमधील आयएनजी विश्लेषकांच्या मते 2018 मध्ये 8.2 दशलक्ष टन प्लॅस्टिक अन्न आणि पेय पॅकेज करण्यासाठी वापरण्यात आले होते. डायजेओने त्यांच्या एकूण पॅकेजिंगमध्ये 5 टक्के पेक्षा कमी प्लास्टिक वापरले आहे.