E-Aadhaar : 8 डिजिटच्या ‘या’ पासवर्डनं उघडते तुमच्या Aadhaar Card ची PDF कॉपी, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भारतीय विशेष ओळख प्राधिकरण (युआयडीएआय) कडून जारी 12 अंकी आधार कार्ड आता देशात अनेक प्रकारे खुप उपयोगी ठरू शकते. मात्र, प्रत्येकवेळी आधार कार्ड कॅरी करणे शक्य नसते. कारण ते हरवण्याची सुद्धा भिती असते. अशावेळी ई-आधार द्वारे तुम्हाला खुप मदत होऊ शकते. युआयडीएआय आधार कार्ड धारकांना ई-आधार कार्ड डाऊनलोड करण्याची सुविधा देते. मात्र, एकदा ई-आधार डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला पासवर्डची गरज असते. या पासवर्डशिवाय तुम्ही ई-आधार कार्डची पीडीएफ फाईल उघडू शकणार नाही.

प्रत्येक व्यक्तीसाठी असतो पासवर्ड

युआयडीएआयच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार प्रत्येक आधार कार्ड धारकाचा वेगळा पासवर्ड असतो. युआयडीएआय म्हणते, जर तुम्हाला ई-आधार कार्ड डाऊनलोड करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या नावाच्या पहिल्या चार अक्षरांसोबत जन्माचे वर्ष पासवर्ड म्हणून टाकावे लागेल. येथे लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे नावाची पहिली चार अक्षरे इंग्रजी कॅपीटलमध्ये असावीत.

हे उदारहण लक्षात ठेवा

केस-1

नाव : साई कुमार (SAI KUMAR)

जन्माचे वर्ष : 1990

पासवर्ड : SAIK1990

केस-2

नाव : पी. कुमार (P. Kumar)

जन्माचे वर्ष : 1990

पासवर्ड : P.KU1990

केस – 3

नाव : रिया (RIA)

जन्माचे वर्ष : 1990

पासवर्ड : RIA1990

असे डाऊनलोड करू शकता ई-आधार

ई-आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला युआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग ऑन करावे लागेल. यानंतर आधार सेक्शनमध्ये डाऊनलोड आधारचे ऑपशन मिळेल. आता आधार नंबर, नोंदणी क्रमांक किंवा व्हर्च्युअल आयडीपैकी एकाची निवड करून ते टाका. यानंतर सेंड ओटीपीवर क्लिक करा. ओटीपीची पडताणी झाल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड डाऊनलोड करण्याचे ऑपशन मिळेल.