home page top 1

खुशखबर ! ATM ट्रांजेक्शन फेल झाल्यास बँका वेळेत पैसे परत देणार, उशीर झाल्यास द्यावी लागणार नुकसान भरपाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – RBI ने ग्राहकांच्या फेल झालेल्या व्यवहाराबाबत तक्रारींकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. टर्न अराउंड टाइम (TAT) ने एक ठरविक वेळ ठरवली आहे. या अंतर्गत जर एखाद्या ग्राहकाचे ट्रांजेक्शन फेल्ड झाले तर बँकेकडून विशिष्ट कालावधीसाठी सेटलमेंट केली जाईल आणि जर असे नाही झाले तर बँक ग्राहकाला भरपाई देणार आहे.

आरबीआयने सांगितले की, ग्राहकांनी तक्रार करण्याआधी बँकेने त्यांना भरपाई द्यायला हवी. ग्राहकांच्या तक्रारी लक्षात घेऊन केंद्रीय बँकेने पहिल्यांदा एप्रिल महिन्यात टिएटी बद्दलची घोषणा केली होती.

आरबीआई ने आठ वर्गवारीत नवीन व्यवहारांची मांडणी केली आहे. यात एटीएम बाबतचे व्यवहार, कार्डची देवाणघेवाण, तत्काळ व्यवहार, यूनिफाइड पेमेंट इंटरफेस आणि प्रीपेड कार्ड बाबतच्या गोष्टींचा समावेश आहे.

ट्रांजेक्शन नंतर पाच दिवसात खात्यात पैसे परत करावे लागणार आहेत. दिलेल्या वेळेपेक्षा उशीर केला तर शंभर रुपये प्रत्येक दिवशी असा दंड भरावा लागणार आहे. याबाबतचे आदेश आरबीआयने बँकांना दिलेले आहेत. ग्राहकांचा विश्वास संपादित करण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. ज्यांच्या तक्रारींचे निवारण होऊ शकले नाही असे ग्राहक बँकिंग लोकपालकडे आपली तक्रार करू शकतात.

Visit – policenama.com 

Loading...
You might also like